खार पोलिसांनी (Khar police) जोगेश्वरी (Jogeshwari) येथील एका तरुणाला विशिंग किंवा फोन घोटाळ्या प्रकरणी अटक (Arrest) केली आहे. हा व्यक्ती कथितपणे एका टोळीचा भाग होता. जिथे त्यांच्यापैकी एकाने फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाची तोतयागिरी केली आणि तक्रारदाराला आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्ड ऑफर केले. त्याला फसवून त्याचे बँक तपशील उघड केले जे नंतर त्याच्या खात्यातून 4.20 लाख रुपये ट्रान्सफर करण्यासाठी वापरले गेले. एफआयआर नोंदवल्यानंतर इंडियन एक्सप्रेसने सायबर गुन्ह्याची (Cyber Crime) ऑनलाइन माहिती दिली होती. 25 वर्षीय सागर घायाल या आरोपीला 11 जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. घायाल एका कॅब सर्व्हिस प्रोव्हायडरमध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतात.
तक्रारदाराच्या खात्यातून पैसे हस्तांतरित केल्यानंतर, फसवणूक करणाऱ्यांनी ते गिफ्ट व्हाउचर खरेदी करण्यासाठी वापरले. जे पुढे ऑनलाइन उत्पादने खरेदी करण्यासाठी वापरले गेले. फसवणूक करणाऱ्यांनी 3.80 लाख रुपयांचे सोने आणि उर्वरित 40,000 रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केल्या. खार पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव निंबाळकर म्हणाले, अटक केलेल्या आरोपीला टोळीने रोखीने विकलेले सोने गोळा करण्यासाठी नियुक्त केले होते.
फसवणूक करणारे गिफ्ट व्हाउचर आणि ऑनलाइन शॉपिंगची ही मोडस ऑपरेंडी वापरतात कारण पोलिसांना त्यांचा शोध घेणे वेळखाऊ ठरते आणि त्यांना वाटते की पोलिस त्यांच्या मागे येणार नाहीत, नेत्रा मुळे, उपनिरीक्षक आणि सायबर अधिकारी म्हणाल्या. खार येथील 49 वर्षीय तक्रारदार आईस्क्रीम आणि दुग्ध व्यवसाय करतात. हेही वाचा Nagpur: 18 महिन्यांच्या मुलीचे अपहरण करून करून बलात्कार; न्यायालयाने सुनावली आजन्म कारावासाची शिक्षा
7 जानेवारी रोजी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, त्याला 5 जानेवारी रोजी सिटी बँक डायनर्स क्लबच्या रिलेशनशिप मॅनेजरकडून एक मजकूर संदेश प्राप्त झाला, ज्याने त्याला आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्ड ऑफर केले.या मेसेजमध्ये एक फिशिंग लिंक होती ज्यावर तक्रारदाराला त्याचे वैयक्तिक तपशील भरण्यास सांगितले होते. तक्रारदाराने लिंकवर क्लिक करताच आणि त्याचे वैयक्तिक आणि बँकिंग तपशील भरताच त्याच्या खात्यातून पैसे डेबिट झाले.