Hottest Day in a Decade For Mumbai: मुंबई मध्ये उष्णतेचा मागील 10 वर्षातील रेकॉर्ड ब्रेक; ‘Severe Heatwave’ साठी  IMD कडून ऑरेंज अलर्ट
Heat Wave प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

ऐन एप्रिल (April) महिन्यातच उन्हाच्या झळांनी नागरिकांची काहिली होत आहे. मुंबईत (Mumbai) मंगळवार 16 एप्रिल च्या दिवशी मागील 10 वर्षातील एप्रिल महिन्यातील सर्वात उष्ण दिवस नोंदवला गेला आहे. मुंबई मध्ये काल कमाल तापमान 39.7 इतकं नोंदवण्यात आलं आहे. आयएमडी कडून 16 आणि 17 अशा दोन दिवसांसाठी ‘Severe Heatwave’ साठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सोमवारी रात्री देखील वर्षातील सर्वात उष्ण रात्र नोंदवण्यात आली आहे. सोमवार, 15 एप्रिल दिवशी रात्रीचं कमाल तापमान देखील 27.8 अंश सेल्सिअल्स होते.

सांताक्रुझ वेधशाळेकडून नोंदवण्यात आलेले 39.7 हे तापमान म्हणजे मुंबई मध्ये सामान्य तापामानापेक्षा हे 6.5 अंश अधिक तापमान आहे. यापूर्वी मुंबई शहरात 2014 च्या एप्रिल मध्ये सर्वात उष्ण दिवस नोंदवण्यात आला होता. तेव्हा कमाल तापमान 39 अंशापर्यंत गेले होते.

मुंबईकरांना रात्री देखील उष्णतेपासून आराम मिळत नसल्याचं चित्र आहे. मुंबईत सोमवारी देखील रात्री कमाल तापमान 27.5 हे उच्चांकांवरच नोंदवलं गेलं आहे. तर कुलाबा वेधशाळेकडून रात्रीचं कमाल तापमान 27.8 पर्यंत नोंदवलं गेलं आहे. नक्की वाचा: Heat Wave Warning: सिंधुदुर्ग जिल्ह्यात 17 एप्रिल रोजी उष्मालाटेची शक्यता; दक्षता घेण्याचे आवाहन, जाणून घ्या काय करावे व काय करू नये .

हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मध्य महाराष्ट्रावर चक्रीवादळामुळे शहरात दिवसा आणि रात्रीचे तापमान उच्चांकी आहे. किमान बुधवारपर्यंत तापमान 38 ते 39 अंश सेल्सिअस दरम्यान वाढण्याची अपेक्षा आहे.

“एप्रिलपासून जूनमध्ये मान्सून सुरू होईपर्यंत, आम्ही तापमान सामान्य पातळीपेक्षा (36 अंश सेल्सिअसच्या) किमान 1-2 अंश वाढण्याची अपेक्षा करतो. या उन्हाळी हंगामात उष्णतेचे दिवसही अधिक असण्याची शक्यता आहे. एका महिन्यात नेहमीच्या 3-4 दिवसांच्या उष्णतेच्या लाटेऐवजी, आम्ही आणखी काही दिवसांचा अंदाज व्यक्त करत आहोत." अशी माहिती Indian Express, शी बोलताना Sunil Kamble, director of IMD Mumbai, यांनी दिली आहे.