Photo Credit -X

Buldhana Bee Attack: लग्न म्हटल्यावर घोडा, डीजे, डान्स हे सर्व काही आलचं. पण जेवढा आनंद आपल्याला होतो. तेवढाच त्रास किंबहूना त्याहून जास्त त्रास प्राण्यांना होतो. डीजेच्या दणदणाटामुळे कित्येकवेळा प्राणी बिथल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना बुलढाणा शहरामध्ये घडली. डीजेच्या दणदणाटामुळे मधमाशा चवताळल्या आणि त्यांनी थेट वऱ्हाडी मंडळींवर हल्ला केला. मधमाशांच्या या हल्ल्यात (Honey bees attack ) 10 मंडळी जखमी (injured)झाले आहेत. ही घटना बुलढाणा शहरातील जाभरूण रोड परिसरात सोमवारी (ता. 29) दुपारच्या सुमारास घडली. (हेही वाचा :40 Students Injured in Bee Attack : मधमाश्यांच्या हल्ल्यात ४० विद्यार्थी जखमी; उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील घटना )

वरातीत सुरू असलेला डीजेच्या दणदणाट कदाचित मधमाशांना सहन झाला नसावा त्यामुळे मधमाशांनी हा उपद्रव केल्याच्या चर्चा आहेत. मधमाशांनी सपाट्यात येईल त्या व्यक्तीला चावा घेतला. त्यामुळे मिळेल त्या वाटेने वऱ्हाडी पळाले. जखमींनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुभाष गवई, पंकज गवई, राजू गवई, माया जाधव,रमाबाई जाधव, बबन जाधव,अवंती वावळे, मायाबाई झिने, सौरभ हिवाळे, सागर जाधव, राजू वाहुळे अशी जखमींची नावे आहेत.

सोमवारी लग्नसमारंभाचा कार्यक्रम उरकल्यानंतर वऱ्हाडी मंडळींनी नवरदेवाची वरात काढली. वरातीत डीजे फूल आवाजात सुरू होता. डीजेच्या तालावर वऱ्हाडी मंडळी बेधुंद होऊन नाचत होते. दरम्यान, डीजेच्या दणदणाटामुळे एका झाडावर असलेल्या मधमाशांना प्रचंड त्रास झाला. अख्खा मधमाशांचा गट उटला आणि त्यांनी थेट उपस्थित वऱ्हाडी मंडळींवर हल्ला केला. अचानक मधमाशा आल्याने वऱ्हाडी मंडळींचा चांगलीच धांदल उडाली. दिसेल त्या वाटेने वऱ्हाडी मंडळी पळत सुटले.