Gold Rate Today: मुंबई, पुणे यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये काय आहे आज सोन्याचा दर?
Gold Rate | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Gold Rates on 1st July: कोरोना व्हायरस संकट आणि लॉकडाऊन यामुळे सोन्या-चांदीच्या दरावर चढउतार दिसून येत होते. दरम्यान अनलॉक 1 ला सुरुवात झाल्यानंतर सोन्याचे भाव वधारले. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. आजच्या दिवशी भारतात 24 कॅरेट सोन्याचा दर 48,818 रुपये प्रति तोळा इतका असून 22 कॅरेट सोन्याचा दर 44,749 इतका आहे. सोन्या-चांदीच्या दरात दिवसागणित बदल होत आहेत. तसंच शहरांनुसारही सोन्या चांदीच्या किंमतीत फरक दिसून येतो.

काल मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर 48329 रुपये प्रति तोळा इतका होता. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 47339 रुपये प्रति तोळा होता. तर आज सोन्याचे दर वाढलेले दिसून येत आहेत. आजच्या दिवशी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर काय आहेत, जाणून घेऊया. सोन्याचा दर  goldpriceindia.com नुसार प्रतितोळा 24 कॅरेट आणि 22 कॅरेट असा देण्यात आला आहे.

आजचा सोन्याचा दर:

शहर

24 करेट/प्रतितोळा

22 करेट/प्रतितोळा

मुंबई 48363 रुपये

47383 रुपये

पुणे

49950 रुपये

47560 रुपये

नाशिक

49930 रुपये

47560 रुपये

नागपूर

49913 रुपये

47573 रुपये

सोलापूर

49898 रुपये

47578 रुपये

आजचा चांदीचा दर:

काल देशात चांदीचा दर 49350 रुपये प्रति किलो इतका होता. तर आज त्यात वाढ झाली असून आजचा दर 49714 इतका आहे. तर मुंबईत चांदीचा दर अधिक आहे.  आजच्या दिवशी मुंबईत चांदीचा दर 50800 रुपये प्रति किलो इतका आहे. हा दरही goldpriceindia.com या वेबसाईटनुसार देण्यात आला आहे.

दरम्यान देशासह राज्यात कोरोना व्हायरसचे संकट गडद आहे. दिवसागणित कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 174761 इतकी झाली असून देशात एकूण 585493 इतके कोरोना बाधित रुग्ण आहेत. दरम्यान कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील दिलासादायक आहे.