Gokul Milk | (Photo Credit - Gokul )

आधीच वाढलेल्या महागाईमध्ये सर्वसामन्यांना आणखी एक झटका बसला आहे. गोकुळच्या गायीच्या दुधात 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना दूधासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. याआधी गोकुळचे गायीचे दूध 54 रुपये प्रति लिटर मिळत होते. हे दूध आता 56 रुपये झाले आहे. दूध पावडर विक्रीमध्ये तोटा सहन करणाऱ्या व्यापारांना यामुळे दिलासा मिळाला आहे. आजपासून गोकूळची दरवाढ लागू होणार आहे. मात्र या निर्णयामुळे सर्वसामन्य नागरिकांना मोठा त्रास हा सहन करावा लागू शकतो.   (हेही वाचा - शेतकऱ्यांना दिलासा! दुधाला मिळणार प्रतिलिटर 30 रुपये स्थायीभाव आणि शासनाकडून 5 रुपये अनुदान, 1 जुलैपासून नवे दर लागू)

मुंबईत गोकुळ दुधाची तब्बल 3 लाख लिटर विक्री होते. तर पुण्यात भागात 40 हजार लिटर दूधाची विक्री होते. त्यामुळे आता दूध खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.परंतु दुसरीकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दूधाला 35 रुपये दर घोषित करण्यात आले आहेत.  दूधाला 40 रुपये भाव मिळावा यासाठी राज्यातील शेतकरी आक्रमक झाले होते.त्यानंतर सरकारने 35 रुपयांना भाव देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी आणि बटरचे दर कमी झाल्याने राज्यातील दूध खरेदी दरावर परिणाम झाला होता. यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आले होते. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी दुधाला प्रतिलिटर 30 रुपये स्थायीभाव आणि शासनाकडून 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

सध्या खुले दूध बाजारभाव 90 रुपये प्रति लिटर आहे. तर गोकुळ दूध 1 लिटर 72 रुपयांना मिळत आहे. मदर डेअरीचे एक लिटर दूध 76 रुपये तर अमूल दूध 68 रुपयांना विकले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून दूधाचे दर 40 रुपये व्हावे, यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना आंदोलन केलं होते. त्याच पार्श्वभूमीवर दूधाचे दर 35 रुपये करण्यात आले आहेत.