Bandra-Worli Sea Link Toll Charges Increased: मुंबईच्या राजीव गांधी वांद्रे वरळी सी-लिंक (Bandra-Worli Sea Link) वरील टोल शुल्क (Toll Charges) 1 एप्रिलपासून अंदाजे 18 टक्क्यांनी वाढणार आहे, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कार आणि जीपसाठी वन-वे ट्रिपचे नवीन दर 100 रुपये असतील, तर मिनीबस, टेम्पो आणि तत्सम वाहनांसाठी 160 रुपये आकारले जातील.
सी लिंकवर एकेरी प्रवासासाठी दोन-एक्सल ट्रकला 210 रुपये मोजावे लागतील. 1 एप्रिल 2021 पासून कार आणि जीपसाठी 85 रुपये, मिनीबस आणि हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी 130 रुपये आणि टू-एक्सल ट्रक आणि बससाठी 175 रुपये आकारण्यात येत होते. (हेही वाचा -Bandra-Worli Sea Link: भाजपच्या माजी आमदाराच्या मुलाने वांद्रे-वरळी सी-लिंकवर आपली लॅम्बोर्गिनी रेलिंगमध्ये घुसवली, गुन्हा दाखल)
सुधारित टोल दर 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2027 या कालावधीत लागू होतील. वरळी आणि वांद्रे दरम्यानचा महत्त्वाचा संपर्क असलेल्या सी लिंकचा वापर करणाऱ्या वाहनचालकांना टोलच्या आगाऊ खरेदीवर 10 टक्के आणि 20 टक्के सूट मिळू शकते. (FASTag देशभरात बंधनकारक पण मुंबई मध्ये Bandra-Worli Sea Link सोबत 5 टोलनाक्यांवर मार्च महिन्यापर्यंत स्वीकरली जाणार रोख रक्कम!)
मरीन ड्राईव्ह-वरळी कोस्टल रोड आणि वांद्रे-वर्सोवा कोस्टल रोडचे बांधकाम पूर्ण झाल्याने सी लिंकशी संपर्क वाढेल. कोस्टल रोड प्रकल्पाचा पहिला टप्पा, वरळी आणि मरीन ड्राइव्ह दरम्यानच्या 10.5 किमी लांबीचा असून त्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सध्या तो टोलमुक्त आहे.