Sanjay Rathod (Photo Credits: Facebook)

शिंदे फडणवीस सरकारला (Shinde Fadnavis Government) कालचं 100 दिवस पूर्ण झाले. या मंत्रीमंडळात भाजपच्या 10 तर शिंदे गटाच्या 10 मंत्र्यांचा समावेश आहे. यांत अन्न आणि औषध प्रशासन मंत्रालय सांभाळणारे मंत्री म्हणजे संजय राठोड (Sanjay Rathod). कायमचं वादाच्या भोवऱ्यात सापडणारे संजय राठोड पुन्हा एकदा त्यांच्या ट्वीटर अकाउंटमुळे (Twitter Account) चर्चेत आले आहेत. कारण गेले तीन महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदेंनी बंड केलं होतं तेव्हा दिग्रस मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार संजय राठोड शिंदे गटात सामिल झाले. त्यानंतर खातेवाटपा दरम्यान त्यांना मंत्रीपद दिल्या गेलं. त्यावरुनही राजकीय गोटात चर्चेला उधाण आलं होत. पण आता पुन्हा एकदा संजय राठोड चर्चेत आले आहेत ते त्यांच्या ट्वीटर अकाउंटमुळे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्री पदावर असताना आणि शिंदे गटाचा भाग असतानाही संजय राठोडांच्या ट्वीटर वॉलवर शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेना आदित्य ठाकरेचा (Aditya Thackeray) फोटो दिसुन येत आहे. या फोटोमुळे राजकीय गोटात मोठी खळबळ झाली आहे.

 

मंत्री पदावर असताना आणि शिंदे गटाला पाठींबा दर्शवला असतानाही ट्वीटर वॉलवर उध्दव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंचा फोटो कसा असा सवाल उपस्थित होत आहे. तर याबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खुद्द आपल्याकडे 40 आमदार असल्याचा दावा करताता पण त्यापैकी फक्त आमदारचं नाही तर थेट मंत्री पद उपभोगणारे संजय राठोड यांच्या ट्वीटर वॉलवर उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरेंचा फोटो का असा प्रश्न पडला आहे. (हे ही वाचा:- PFI Threat Letter: पीएफआयच्या ब्लॅकलिस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहसह राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचा समावेश; PFI च्या कार्यकर्त्याकडून धक्कादायक पत्र)

 

 

अजुन शिंदे गट किंवा अन्न आणि औषधी प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी याबाबत कुठलही स्पष्टीकरण दिलं नसलं तरी सोशल मिडीयावर संजय राठोड याच्या ट्वीटर अकाउंटबाबत मोठी चर्चा होत आहे. उध्दव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंचा फोटो वॉलपेपर ठेवण्यामागे नेमक काय कारण किंवा संजय राठोडांचा खरंचं शिंदे गटास पाठींबा आहे की नाही यावर आता प्रश्न उपस्थित होत आहे.