गेल्या 8 दिवसांपासून कोल्हापूर, सातारा, सांगली भागात थैमान घातलेल्या पावसाच्या पूराचा फटका राष्ट्रीय महामार्गालाही बसला. यामुळे राष्ट्रीय महामार्ग 4 (NH-4) वरील वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र आता या भागातील पावसाचा जोर कमी झाला असून आवश्यक वस्तूंच्या दळणवळणासाठी अवजड वाहनांसाठी हा महामार्ग पुन्हा सुरु करण्यात आला. गेले 8 दिवस हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
कर्नाटकातून कोल्हापूरच्या दिशेनं येणारी वाहतूक अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. महामार्गाची पाहणी करून दुपारनंतर ही वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे.
ANI चे ट्विट:
Maharashtra: Flood-affected National Highway (NH) 4 re-opens for heavy vehicles and SUVs at Kolhapur-Sangli Phata pic.twitter.com/NWa1WOnsXn
— ANI (@ANI) August 12, 2019
महामार्गावर अजूनही दीड फूट पाणी आहे. मात्र पूरपरिस्थितीपाहता आवश्यक वस्तू पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी या मार्गावरून अवजड वाहतुकीसाठी सुरुवात झाली आहे.
कोल्हापूरात झालेल्या कोसळधार पावसामुळे या भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. या पूराचा फटका राष्ट्रीय महामार्गाला बसला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक तब्बल 8 दिवस बंद होती. दळणवळणासाठी महत्त्वाचा समजला जाणारा हा महामार्ग बंद पडल्यामुळे पूर्ण वाहतूक सेवा ठप्प झाली होती. मात्र 8 दिवसांनी ही वाहतूक पुन्हा सुरु झाल्यामुळे वाहनचालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.