Fake Vaccination Camp at Hiranandani Estate Society: चारकोप मधील शिवम हॉस्पिटलच्या डॉक्टर दांम्पत्यासह 10 जणांना अटक; Special SIT कडून होणार तपास
Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: PTI)

मुंबई पोलिसांनी चारकोप परिसरातील शिवम हॉस्पिटलचे मालक डॉ. शिवराज पटारिया आणि त्यांची पत्नी डॉ. नीता पटारिया यांना बनावट कोविड 19 लसीकरण कार्यक्रम राबवल्या प्रकरणी अटक केली आहे. पोलिस तपासामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, या हॉस्पिटलकडून मुदत संपलेल्या कोविड 19 लसींच्या वायल्स विकत घेण्यात आला आणि त्या लसीकरणामध्ये वापरण्यात आल्या. दरम्यान या वायल्स एप्रिल 2021 लाच संपल्या होत्या. या प्रकरणामध्ये आता अधिक तपासासाठी Deputy Commissioner of Police, Vishal Thakur यांच्या खाली विशेष एसआयटी स्थापन करून  Hiranandani Estate Society मधील बनावट लसीकरण कॅम्पचा आता तपास केला जाणार आहे. Fake COVID-19 Vaccine Scam: मुंबईमध्ये खोट्या लसीकरणाला बळी पडले 2 हजाराहून अधिक लोक; 4 FIR दाखल.

मुंबई मध्ये मागील काही दिवसात अशी बनावट कोविड 19 लसीकरण कार्यक्रमांची अनेक उदाहरणं समोर आली आहे. शिवम हॉस्पिटलमध्येही विकत घेण्यात आलेल्या काही वायल्स मध्ये औषध होते तर काही रिकाम्या होत्या. त्याच वायल्स पुढे हिरानंदनी इस्टेट सोसायटीमध्ये झालेल्या बनावट लसीकरण कार्यक्रमामध्येही वापरण्यात आल्याची माहिती आहे. आज विश्वास नांगरे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार या हिरानंदानी इस्टेट सोसायटी प्रकरणामध्ये आतपर्यंत तब्बल10 जणांना अटक झाली आहे. मुख्य आरोपीचे बॅंक अकाऊंट फ्रीज करण्यात आले आहे. तर 6 केसेज रजिस्टर असून त्यांच्याकडून अजून मुंबईत 8 विविध ठिकाणी कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत.

30 मे च्या दिवशी सोसायटीच्या रहिवाश्यांनी त्यांच्यामनात शंकेची पाल चूकचूकल्याने पोलिसांत धाव घेतली. Hiranandani Estate Society मध्ये लसीकरण कॅम्पनंतर कोणालाच त्याचा साईड इफेक्ट जाणवला नाही. तसेच प्रत्येकाला वेगवेगळ्या हॉस्पिटल मधून वेगवेगळ्या तारखेचे लसीकरण प्रमाणपत्र मिळत असल्याने हा संशय वाढत गेला. 435 फ्लॅट्स असलेया या कॉम्प्लेक्स मध्ये 390 जणांनी लसीकरणासाठी नोंदणी केली होती. ज्यामध्ये घरकाम करणारे, सुरक्षा रक्षक ते काही रहिवाश्यांचा सहभाग होता.

Hiranandani Estate Society ने राजेश पांडे या व्यक्तीने तो कोकिलाबेन हॉस्पिटलचा प्रतिनिधी असल्याचं भासवत 400 डोस पुरवण्याचं मान्य केले होते. 1260 प्रति डोस नुसार त्याने अंदाजे 5 लाख या रहिवाश्यांकडून कमावले आहेत.