रविंद्र वायकर विरूद्ध अमोल कीर्तीकर या लढतीमध्ये लोकसभेच्या निवडणूकीत फेरमतमोजणी करताना कीर्तीकरांचा 48 मतांनी पराभव झाला आहे. दरम्यान याप्रकरणात आता मतमोजणी केंद्रावर वायकरांचा नातेवाईक मोबाईल फोन घेऊन पोहचला असल्याची माहिती समोर आली आहे. ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल हा रवींद्र वायकर यांच्या मेव्हण्याच्या हाती असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. त्यानंतर, विरोधी पक्षातील नेत्यांनी ईव्हीएमच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यावर आता त्यावर, आता निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे. ईव्हीएम हे स्वतंत्र डिव्हाईस असून त्याला कुठलीही मोबाईल कनेक्टीव्हीटी नसल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं आहे. (हेही वाचा -  Aaditya Thackeray On EVM: गद्दार उमेदवार आता लोकशाहीशी गद्दारी करत आहे; आदित्य ठाकरेंची टिका)

पाहा  व्हिडिओ -

डेटा कम्पॅलेशन सिस्टीम आणि ईव्हीएम वेगवेगळं आहे. ईव्हीएमशी डेटा कम्पॅलेशन सिस्टीमद्वारे केवळ वेबसाईटवर डेटा टाकला जातो, त्याच्याशी संबंधित काही ओटीपी मोबाईलवर येतो, त्यासाठी काही मोबाईल होते, त्यापैकीच एक म्हणजे डेटा ऑपरेटर गुरव यांच्याकडेही मोबाईल होता, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिली. तसेच, ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, त्याला कुठलीही वायर किंवा वायरलेस कनेक्टीव्हीटी नसल्याचे त्यांनी सांगितले.

गुरव आमचा डेटा ऑफरेटर आहे, हा जो गोंधळ झाला तो त्या आमच्या कर्मचारी गुरवमुळे झाला असून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे. मतमोजणी आणि हे मोबाईल प्रकरण पूर्णपणे वेगळं आहे, असेही वंदना सूर्यवंशी यांनी सांगितले.