मुंबईत (Mumbai) एका वृद्ध जोडप्याने आजारपणाला कंटाळून आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला, त्यात पत्नीचा मृत्यू झाला, तर पती रुग्णालयात दाखल आहे. या लोकांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेत 76 सविता सुर्वे यांचा मृत्यू झाला, तर दत्ताराम सुर्वे यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांचा मुलगा त्यांना नाश्ता देण्यासाठी गेला असता दोघेही दरवाजा उघडत नसल्याने हा प्रकार उघडकीस आला. शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता दोघेही बेडवर झोपले होते आणि उत्तरही देत नव्हते. कस्तुरबा पोलिसांनी सांगितले की, दत्ताराम सुर्वे बोलण्याचा प्रयत्न करत होते पण नीट बोलू शकत नव्हते.
त्यानंतर त्यांना तात्काळ कांदिवली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून, सध्या ते रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, सविता सुर्वे या गेल्या 15-20 वर्षांपासून मधुमेहाने त्रस्त होत्या आणि नीट पाहूही शकत नाहीत. याशिवाय त्यांचे पती दत्ताराम सुर्वे यांना 25 वर्षांपासून हृदयविकाराचा त्रास आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली आहे. त्यांना अंगात असह्य वेदनाही होत होत्या. हेही वाचा Crime: क्रिकेटच्या मैदानावर झालेला वाद पोहोचला विकोपाला, रागातून बॅटने तरुणाच्या डोक्यावर केला प्रहार, एकास अटक
या दाम्पत्याचा मुलगा सचिन सुर्वे हा 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.15 वाजता नेहमीप्रमाणे आई-वडिलांना नाश्ता देण्यासाठी गेला होता. त्याने दरवाजा ठोठावला असता कोणीही दरवाजा उघडला नाही. त्यानंतर त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला. पोलिसांनी सांगितले की त्यांनी दार उघडताच त्यांना दिसले की त्यांची आई कोणत्याही प्रकारे प्रतिसाद देत नाही आणि वडील क्वचितच बोलू शकत होते.