![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/dycm-shinde-e.jpg?width=380&height=214)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना प्रतिष्ठित महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार (Mahadji Shinde Rashtriya Gaurav Award) जाहीर झाला आहे. दिल्ली (Delhi) मध्ये हा पुरस्कार उद्या 11 फेब्रुवारी दिवशी शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदेंना प्रदान केला जाणार आहे. पुणे येथील सरहद संस्थेतर्फे (Sarhad Institute) हा पुरस्कार दिला जातो. दिल्लीतील न्यू महाराष्ट्र सदन येथे पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.
पुरस्काराचे स्वरूप 5 लाख रूपये, मानपत्र, सन्मान चिन्ह आणि शिंदेशाही पगडी असे आहे. केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, जेष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे आणि पद्मभूषण राम सुतार दिल्लीत होणार्या या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.
Maharashtra’s Deputy Chief Minister and Shiv Sena’s chief leader, Eknath Shinde will be honored with the prestigious Mahadji Shinde Rashtriya Gaurav Award, presented by Pune-based Sarhad Institute. The award ceremony will be held at New Maharashtra Sadan in New Delhi on Tuesday,… pic.twitter.com/LWFXWEfoek
— ANI (@ANI) February 10, 2025
सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित याच कार्यक्रमात दिल्लीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा गौरव देखील होणार आहे.