महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. फक्त अत्यावश्यक सेवासुविधांच्या खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडू शकतात. पण त्यावेळी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. त्यातसोबत कोरोनाबाधित रुग्णांवर वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून दिवसरात्र उपचार केले जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला पोलीस दलातील कर्मचारी सुद्धा अहोरात्र आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत. याच दरम्यान, डोंबिवलीत (Dombivali) एका अज्ञात व्यक्तीने बँकेचे एटीएम मशीन तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न फसल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत डोंबिवली मधील पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे.
पेंढारकर महाविद्यालयाजवळील पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम फोडण्याचा एका व्यक्तीकडून करण्यात आला. मात्र व्यक्तीचा चोरी करण्याचा जो प्लॅन होता त्यामध्ये त्याला फार मोठे नुकसान झाले आहे. पंजाब नॅशनल बँकेची शाखा एप्रिल 30 या दिवशी 5 वाजल्यापासून ते 2 मे रोजी सकाळी 10 वाजते पर्यंत बंद होती. मात्र या काळातच अज्ञात व्यक्तीने चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात कलम 380, 427 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच चोरट्याला पकडण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आले आहे.(मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, मालेगाव येथील कार्यालये, स्टोअर्स, दारूची दुकाने 4 मेपासून उघडणार नाहीत; राज्यातील लॉक डाऊनबाबत महाराष्ट्र शासनाने जारी केले मार्गदर्शक तत्त्वे)
दरम्यान, राज्यात लॉकडाउनचे आदेश जाहीर करण्यात आल्यानंतर चोरीची प्रकरणे थांबल्याचे दिसून आली आहेत. मात्र डोंबिवलीतील हा प्रकार पाहता आता खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बँकेचे कामकाज सुद्धा अंशता ठप्प झाले आहे. मात्र बँकांना ठरवून दिलेल्या वेळात सध्या कामकाज पूर्ण करावे लागत आहे. परंतु त्यावेळी लॉकडाउनच्या नियमांचे पालन करावे अशा सुचना सुद्धा देण्यात आल्या आहेत.