Road Accident | (Photo credit: archived, edited, representative image)|

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील (Dhule-Solapur Highway) गेवराईजवळील गढी पुलावर 5 जणांचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. एसयूव्ही गाडी डिव्हायडरला धडकल्याने किरकोळ अपघात झाला होता. यामध्ये कोणीच जखमी नव्हते, मात्र गाडी डिव्हायडरवर चढल्याने मागे घेण्यासाठी गाडीतील सारे जण खाली उतरले आणि त्याचवेळी या महामार्गावरून येणार्‍या भरधाव वेगातील ट्रकने त्यांना उडवले. यामध्ये सहाही जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी अवस्थेमध्ये हॉस्पिटल मध्ये दाखल होता. त्याचाही मृत्यू झाला आहे. दरम्यान अपघातामध्ये बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा समावेश आहे.

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हा अपघात अत्यंत भीषण होता. ट्रकच्या धडकेनंतर काही मृतदेह 100-200 फूट वर उडाले. त्यांची अवस्था काळजाला चिरणारी होती. या दुर्घटनेमुळे गेवराई शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

धूळे सोलापूर हायवे वर अपघात

 

देवराई मध्ये हा अपघात रात्री 11 च्या सुमारास झाला आहे.