Dhule and Ahmednagar Municipal Corporation | (Photo courtesy: archived, edited, images)

Dhule and Ahmednagar Municipal Corporation Election 2018 : महाराष्ट्रात प्रतिष्ठेच्या बनलेल्या महानगरपालिकांसाठी (Municipal corporation Elections) नुकतेच मतदान पार पडले आहे. धुळे महानगर पालिकेमध्ये (Dhule Municipal Corporation) भाजपाने पहिल्यांदा एकहाती सत्ता मिळवली आहे. भाजपाला सर्वाधिक 49 जागा मिळाल्या आहेत. तर अहमदनगर महापालिकेमध्ये (Ahmednagar Municipal Corporation) मॅजिक फिगर गाठण्यासाठी राजकीय पक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. अहमदनगर महापालिकेमध्ये शिवसेनेला सर्वाधिक म्हणजे 24 जागा मिळाल्या आहेत. मात्र सत्ता स्थापनेसाठी कशी समीकरण जुळणार हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे.

धुळे महानगर पालिका महापौर पद

धुळे महानगरपालिकेमध्ये महापौर पद यंदा खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. भाजपाच्या हाती एकहाती सत्ता आल्याने महापौरपदी देखील त्यांचाच उमेदवार असेल. धुळे महानगरपालिकेच्या महापौरपदी चार उमेदवारांची नावं प्रामुख्याने आहेत. धुळे महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता; कमळ फुलले, आमदार अनिल गोटे गटाचा धुव्वा

महापौरपदासाठीचे उमेदवार कोण ?

प्रदीप कर्पे -

प्रदीप भाजप कार्यकर्ते आणि गोपिनाथ मुंडे यांचे खंदे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.

भारती माळी -

भारती माळी या सध्याच्या विद्यमान नगरसेविका आहेत.

शीतल नवले -

माजी महापौर मोहन नवले यांचे पुत्र शीतल नवले यांचं नावदेखील शर्यतीमध्ये आहे.

हर्ष रेलन -

हर्ष रेलन हे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीमधून भाजपा पक्षात आले आहेत.

अहमदनगर महानगरपालिका महापौर

अहमदनगर महानगरपालिकेमध्ये शिवसेनेने सर्वाधिक जागा मिळवल्या असल्या तरीही सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेल्या 35 या मॅजिक फिगरसाठी अनेक पक्ष राजकीय जुळवाजुळव करत आहेत. महापौरपदासाठी शिवसेनेकडून अनिल शिंदे, बाळासाहेब बोराटे, सुभाष लोंढे, गणेश कवडे व योगीराज गाडे ही नावं चर्चेमध्ये आहेत तर राष्ट्रवादीकडून ज्योती गाडे-कर्डिले व गणेश भोसले या नावांची चर्चा सुरू झाली आहे.

लवकरच महापालिकेच्या विशेष महासभेत महापौर (Mayor)  निवडण्यात येईल .