Dadar Footover Bridge (Photo Credits: Twitter)

14 मार्च रोजी संध्याकाळी मुंबईतील (Mumbai) छत्रपती शिवाज महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) जवळील पादचारी पुल (Footover Bridge Collapses) कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर आता मुंबईतील पुलांची पहाणी सुरु करण्यात आली आहे. त्यानंतर दादर फुल मार्केटला पुलाला जोडणारा रॅम्प आणि जिना दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरचा रॅम्प आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 3 चे जिने हे दुरूस्तीसाठी बंद करण्याचा निर्णय झाला आहे. आजपासून (17 मार्च) या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. फलाट क्रमांक 1 जवळचा रॅम्प 90  दिवसांसाठी बंद करण्यात येणार आहे. तर फलाट क्रमांक 2 आणि 3 जवळचे जिने 13 दिवसांसाठी बंद करण्यात येणार आहेत. हा पूल फक्त दादर पश्चिम आणि मध्यच्या प्रवाशांसाठी सुरु रहाणार आहे.

ANI ट्विट:

काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाज महाराज टर्मिनस येथील पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 जण ठार तर 30 हून अधिक लोक जखमी झाले. त्यापूर्वीही सप्टेंबर 2017 मध्ये एल्फिन्स्टन रोड स्थानकाजवळील चेंगराचेंगरीत अनेक मुंबईकरांना जीव गमवावा लागला होता. तर जुलै 2018 साली अंधेरीतही असाच एक पादचारी पूल कोसळला होता. या दुर्घटनांनंतर मुंबईतील सर्व पुलांची पहाणी करण्याचे काम मुंबई पालिका आणि रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे.