पालकमंत्री मदन येरावार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश; बनावट कागदपत्रे तयार करून केली जागेची विक्री
मदन येरावार (संग्रहित संपादित प्रतिमा)

पालकमंत्री (Guardian Minister), मंत्रिमंडळातील आणि भाजपचे प्रमुख नेते  मदन येरावार (Madan Yerawar) यांच्यासह 16 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यवतमाळ (Yavatmal) येथे बनावट कागदपत्रे तयार करून जागेची विर्की केल्याचा गंभीर आरोप यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आयुषी किरण देशमुख यांनी याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली होती, काल याबाबत सुनावणी पार पडली, त्यावेळी यवतमाळ न्याय दंडाधिकाऱ्यांनी (प्रथम श्रेणी) हे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

(हेही वाचा: निवडणूक कामांबाबत कामचुकार करणाऱ्या 400 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल; कठोर कारवाईचे आदेश)

यवतमाळ शहरातील मोक्याची जागा हडपण्याचा पालकमंत्र्यांचा डाव होता. जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हेसह 12 जणांनी मिळून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने या जमिनीची खोटी कागदपत्रे तयार केली. पुढे मदन येरावार,अमित चोखानी यांच्याकडे या मालमत्ता सुपूर्त करण्यात आल्या. ही गोष्ट लक्षात येताच आयुषी देशमुख यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने देशमुख यांच्या बाजूने निकाल देत पालकमंत्री आणि या कटात सामील असलेल्या इतर 16 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

यामध्ये सामील असलेले लोक - मदन येरावार, चित्तरंजन कोल्हे, जयश्री ठाकरे, विजयश्री कारेकर, जयंत कोल्हे, राजश्री संजय देवतळे, तेजश्री थुटे, दिलीप कोल्हे, अर्चना कोल्हे, आशिष कोल्हे, वैशाली कोल्हे, अमोल कोल्हे, शीतल धोटे, अमित चोखानी, तत्कालीन वरिष्ठ अधिकारी