शनिवारी महाराष्ट्रात (Maharashtra) सलग तिसऱ्या दिवशी कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ नोंदविण्यात आली असून शनिवारी 5,318 नवीन प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी राज्यात सर्वाधिक 5,024 रुग्ण आढळून आले होते. राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 6 हजाराच्या जवळ पोहचला आहे. ANI ने दिलेल्या राज्य आरोग्य विभागाच्या निवेदनात म्हटले की, राज्यात कोरोनाची एकूण संख्या आता 1,59,133 आहे. राज्यातही गेल्या 48 तासात झालेल्या 86 सह एकूण 167 मृत्यूंची नोंद झाली आहे. शुक्रवारी महाराष्ट्राने दीड लाखांचा टप्पा ओलांडला होता. शुक्रवारी महाराष्ट्रात एका दिवसात सर्वाधिक 5,024 कोविड बाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली होती. यापूर्वी गुरुवारी 4,841 रुग्ण आढळले होते. राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मुंबई (Mumbai) शहराने सर्वाधिक हातभार लागले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. (Coronavirus Update: राज ठाकरे यांचे निवासस्थान 'कृष्णकुंज'वर कोरोनाने पुन्हा दिली धडक, आणखी एक कामगार कोविड-19 संक्रमित)
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले की, सध्या महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, तेलंगणा, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या आठ राज्यांमधून एकूण रुग्णांपैकी 85.5 टक्के रुग्ण येत आहेत. शिवाय, देशात व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी 87 टक्के मृत्यू या राज्यांमध्येच नोंदविण्यात येत आहेत. महाराष्ट्रात आजवर 84,245 रुग्ण बरे झाले आहेत तर शुक्रवारी 4,430 लोक बरे झाल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे, मुंबईमध्ये गेल्या 24 तासांत 1,460 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद झाल्याने शहरात एकूण संक्रमितांचा आकडा 74,252 इतका झाला आहे. मुंबईमध्ये 4,282 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 27,134 लोक सक्रिय आहेत.
Maharashtra reports 167 deaths and 5318 new #COVID19 positive cases. Out of these 167 deaths- 86 occurred in the last 48 hrs and rest 81 are from the previous period. The total number of cases in the State stands at 1,59,133: State Health Department
— ANI (@ANI) June 27, 2020
कोरोना विषाणूच्या संसर्गाची एकूण संख्या पाच लाखांच्या पुढे गेली असून, भारतात शनिवारी एकाच दिवसात जास्तीत जास्त 18,552 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या महामारीमुळे देशामध्ये आतापर्यंत 15,685 लोकांचा बळी गेला आहे. मंत्रालयाने म्हटले की त्यांनी आपल्या 17 व्या बैठकीत गटाला व्हायरसमधून बरे होणाऱ्यांची संख्या आणि मृत्यू तसेच संक्रमणाची प्रकरणे दुप्पट करण्याचे आणि वेगवेगळ्या राज्यात तपासणीची संख्या वाढविण्याबाबत माहिती दिली. राज्यांच्या मदतीसाठी सार्वजनिक आरोग्य तज्ञ, महामारी रोग विशेषज्ञ आणि सहसचिव स्तरावरील वरिष्ठ अधिकारी यांच्यासह 15 केंद्रीय पथके तैनात करण्यात आली आहेत.