Congress | (Photo Credits: Facebook)

सातत्याने पराभवाच्या गर्तेत जाणारा काँग्रेस (Congress) पक्ष आता स्वत:ला सावरण्याच्या विचारात दिसतो आहे. रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याशी जरी जमले नसले तरी काँग्रेस स्वबळावरच पुन्हा एकदा पक्ष उभारणीच्या कामाला लागणार असे दिसते. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार स्वत: हंगामी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही तशी तयारी सुरु केली आहे. लवकरच पक्षाचे एक चिंतन शिबीर पार पडणार आहे. या शिबीरात स्वत: सोनिया गांधी आणि राहुल गांधी प्रमुख भूमिका मांडणार असल्याच समजते.

भापच्या आक्रमक राजकारणारणाला पुन्हा एकदा थोपविण्यासाठी काँग्रेस रणनिती आखते आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्ष मुख्यालयात येत्या 9 मे रोजी काँग्रेस कार्यकारिणीची (सीडब्ल्यूसी) एक बैठक बोलावली आहे. सांगितले जात आहे की, या बैठकीत उदयपूर येथे होणाऱ्या चिंतन शिबीरातील कार्यक्रमावर अधिकृतपणे मोहोर उमठवली जाणार आहे. याच दिवशी सोनिया गांधी एक संदेश देत भाजपवर जोरदार प्रहार करणार असल्याचेही सांगितले जात आहे. काँग्रेस शिबीरात नेतृत्व बदल आणि अंतर्गत मुद्दे, विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकीची रणनिती, पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Loudspeaker Controversy: 'मनसेच्या आंदोलनामुळे हिंदूंचे अधिक नुकसान, मुंबईमधील 2,404 मंदिरे लाऊडस्पीकर वापरू शकणार नाहीत'- काँग्रेस नेते Sachin Sawant)

काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी म्हटले आहे की, भाजप ज्या ठिकाणी कमजोर असते. त्यांची ताकत कमी असते त्या ठिकाणी राजकीय फायद्यासाठी तणाव निर्माण करते. जेव्हा निवडणुका संपतात तेव्हा तणावही निवळला जातो. जसे की उत्तर प्रदेश, बिहार पश्चिम बंगाल राज्यात पाहायला मिळाले.

उदयपूर येथे चालणारे हे 13 ते 15 मे असे तीन दिवस हे शिबीर चालणार आहे. त्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांना तसा सांगावाही गेला आहे. तीन दिवसीय शिबीरामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी सहभागी होणार असल्याचे समजते. या शिबीरात 400 पेक्षा अधिक लोक सहभागी होणार असल्याचे समजते.