कोविड-19 (COVID-19) संपूर्ण देशाचा सुरु असलेला लढा जिंकण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा, डॉक्टर्स, वैद्यकिय तज्ज्ञ, परिचारिका शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अशा वेळी दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्या कारणाने उपचारासाठी वैद्यकिय यंत्रणा कमी पडण्याची शक्यता आहे. म्हणून अनेक दिग्गज नेते, कलाकार मंडळी आणि मोठमोठ्या संस्था मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला काही रक्कम देऊ केली आहे. यात शिर्डीच्या साई बाबा संस्थानाने (Shirdi Saibaba Sansthan) 51 कोटी तर सिद्धीविनायक मंदिर न्यासाने (Siddhivinayak Temple) 5 कोटींची मदत जाहीर केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी या संस्थानांचे आभार मानले आहे.
शिर्डी साई बाबा संस्थान साई बाबा संस्थान आणि सिद्धीविनायक मंदिर संस्थानाने केलेल्या मदतीमुळे मी त्यांचे आभार मानतो, तसेच त्यांच्याप्रमाणे अनेक संस्थाने आणि संस्था पुढे येत आहेत, त्यासगळ्यांचे मी स्वागत करतो असेही त्यांनी सांगितले आहे. राज्यातील शिवभोजन केंद्र 3 तास सुरू राहणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
"मला धन्यवाद द्यायचे आहेत, शिर्डी संस्थानने ₹ ५१ कोटी, सिद्धिविनायकने ₹ ५ कोटी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला जाहीर केले आहेत. असे अनेक संस्थाने आणि संस्था पुढे येत आहेत, सगळ्यांचं मी स्वागत करतो." pic.twitter.com/0bQaMhuGjA
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 28, 2020
हेदेखील वाचा- Coronavirus: लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांना मालवाहतूक करण्यास मुभा- जयंत पाटील
तसेच लोक भीतीमुळे वा लॉकडाऊन मुळे घरातून बाहेर पडत नसल्याने रक्ताची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. म्हणून यांच्या मदतीला धावून आलय प्रभादेवीतील श्री सिद्धिविनायक मंदिर संस्थान (Shree Siddhivinayak Trust). लोकसत्ता ने दिलेल्या वृत्तानुसार, आता या मंदिर न्यासाने मुंबईतील सोसायट्यांमध्ये जाऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे ठरवले आहे.
दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून आता हा आकडा 834 वर पोहचला आहे. तर 19 कोरोनाग्रस्त रुग्णांचा यात बळी गेला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health and Family Welfare) दिली आहे. त्यापैकी 67 रुग्ण यशस्वी उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले असून काहींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर अजूनही काहीजण वैद्यकीय निगराणीखाली आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत देशात तब्बल 748 रुग्ण कोरोना बाधित आहेत.