राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. तरी गेले दोन दिवसांत शिंदे फडणवीस सरकारकडून (Shinde Fadnavis Government) काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. याबाबत मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) काय भाष्य करणार यावर सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तरी हा दौरा राजकीय दृष्ट्या अधिक महत्वाचा आहे. कारण विरोधीपक्ष नेते अजित पवार (Opposition Leader Ajit Pawar) आणि धनंजय मुंढे (Dhananjay Munde) आज नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तरी उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) आजच्या राजकिय दौऱ्यांना विशेष महत्व आहे. येणाऱ्या पुढील काहीच दिवसात महापालिकेच्या निवडणुका येवून ठेपल्या आहेत. तरी याच पार्शवभुमिवर राज्यातील राजकीय नेते दौरे करत आहेत अशी चर्चा आहे. पण गेले काही दिवसांपूर्वीचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहिती दिली आहे.
तसेच विरोधीपक्ष नेते अजित पवार (Opposition Leader Ajit Pawar) आणि धनंजय मुंढे (Dhananjay Munde) आज नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याची राज्यभर मोठी चर्चा सुरु आहे. कारण शिंदे फडणवीस सरकारने (Shinde Fadnavis Government) नुकत्याचं घेतलेल्या निर्णयानुसार महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) काही नेत्यांच्या सुरक्षा काढून घेतली किंवा काही नेत्यांच्या सुरक्षेत घट करण्यात आली आहे. त्यामुळे विरोधीपक्ष नेते याविषय महत्वपूर्ण भाष्य करतील अशी चर्चा आहे. (हे ही वाचा:- Mahavikas Aghadi Leader Security: महाविकास आघाडीतील नेत्यांच्या सुरक्षेत मोठे बदल, शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय)
तरी नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्याच्या दौऱ्यात मुख्यमंत्री काय बोलतील याबाबत सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. विशेष म्हणजे कालपासून एअर बस प्रकल्पाबाबत राजकीय वातावरण ढवळून निघाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यावर काय भूमिका मांडता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.