Mou Signed between Govt of Maharashtra & Tembo | X @CMO Maharashtraa

दावोस (Davos) मध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम बैठकीमध्ये (World Economic Forum Meeting) महाराष्ट्रासाठी पहिल्या 3 दिवसांमध्ये 4 लाख 60 हजार कोटींची गुंतवणूक झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी पहिला सामंजस्य करार हा गडचिरोलीसाठी झाला आहे. गडचिरोलीत JSW Group कडून 3 लाख कोटींची गुंतवणूक करण्यासंदर्भात सामंजस्य करार झाला आहे. यामधून गडचिरोलीत सुमारे 10 हजार रोजगार निर्मितीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गडचिरोलीत स्टील, रिन्युएबल एनर्जी, इन्फ्रा आणि सिमेंट, लिथियम बॅटरी आणि सोलर बाबत गुंतवणूक झाली आहे.

यंदाच्या दावोस मधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत देखील आहेत. कल्याणी समूह आणि महाराष्ट्र राज्य शासनामध्ये स्टील आणि संरक्षण क्षेत्रासाठी करार करण्यात आला आहे. या माध्यमातून पोलाद उद्योगासाठी 5 हजार 200 कोटी रुपयांची गुंतवणूक गडचिरोलीत केली जाणार आहे.

महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात कोणते नवे प्रकल्प आले?

सोशल मीडीयात X वर दावोस मध्ये करण्यात आलेल्या सामंजस्य करांची माहिती शेअर केली जात आहे. यामध्ये सुमारे 20 करार करण्यात आले आहेत. यामध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि. चा करार रत्नागिरी मध्ये येणार आहे. विराज प्रोफाईल्स प्रा. लि. चा प्रकल्प पालघर मध्ये प्रस्तावित आहे. एबी इनबेव, अवनी पॉवर बॅटरिज, जेन्सोल हे छत्रपती संभाजीनगर, वारी एनर्जी नागपूर मध्ये , टेम्बो रायगड मध्ये, एल माँट,एच टू ई पॉवर, ब्ल्यू एनर्जी मोटर्स हे पुण्यात, ब्लॅकस्टोन हा माहिती तंत्रज्ञानातील प्रोजेक्ट, ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी हा डेटा सेंटर्स मधील प्रकल्प,बिसलरी इंटरनॅशनल, बुक माय शो चा प्रोजेक्ट एमएमआर मध्ये येणार आहे.