स्वातंत्र्यानंतर गडचिरोलीच्या 15 गावांमध्ये पहिल्यांदा बस सेवा; गावकऱ्यांसोबत CM Devendra Fadnavis यांनी केला प्रवास

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या भागात गट्टा ते वांगेतुरी दरम्यान 32 किलोमीटरचा रस्ता बांधण्यात आला आहे आणि आता इथे बस धावत आहे.

स्वातंत्र्यानंतर गडचिरोलीच्या 15 गावांमध्ये पहिल्यांदा बस सेवा; गावकऱ्यांसोबत CM Devendra Fadnavis यांनी केला प्रवास
Vangeturi-Gardewada-Gatta-Aheri bus service | X

भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष उलटली आहे. मात्र आजही अनेक भाग असे आहेत जिथे लोकांना किमान सुविधा देखील सहज उपलब्ध नाहीत. महाराष्ट्रात गडचिरोली हा नक्षलग्रस्त भाग आहे. गडचिरोली जिल्ह्यातील गर्देवाडा ते वांगेतुरी या दरम्यानच्या सुमारे 15 गावांना स्वात्रंत्र्याच्या साडेसात दशकांनंतर आज (1 जानेवारी) बससेवा सुरु झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या बससेवेचा शुभारंभ करत गावकर्‍यांसोबत प्रवास देखील केला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यामध्ये काही महिन्यांपूर्वीपर्यंत फक्त गर्देवाडा पर्यंतच बससेवा होती. पुढे छत्तीसगड सीमेच्या दिशेने अनेक किलोमीटर पर्यंत महाराष्ट्राच्या भागात पक्के रस्ते आणि पुलच नसल्याने बस जाऊ शकत नव्हती. मात्र आता ही समस्या दूर झाली आहे. माओवाद्यांच्या भागात प्रवास करत मुख्यमंत्र्यांनी आह नक्षलग्रस्त भाग आता भयमुक्त होत असल्याचा संदेश दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा बस प्रवास

गडचिरोली मध्ये माओवाद्यांची भीती आहे. मात्र आता मागील काही वर्षांपासून गडचिरोली पोलिस या भागात आपला प्रभाव वाढवत आहेत. पोलिस मदत केंद्र उभारत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या भागात गट्टा ते वांगेतुरी दरम्यान 32 किलोमीटरचा रस्ता बांधण्यात आला आहे. परिणामी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गर्देवाडाच्या पुढे महाराष्ट्र छत्तीसगड सीमेपर्यंत म्हणजे वांगेतुरीपर्यंत बस सेवा सुरू झाली आहे.

तारक्का सिडामसह एकूण 11 नक्षलवाद्यांनी आज  गडचिरोली पोलीस मुख्यालयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आहे.  

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 2025 05:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).