Chhattisgarh Naxal Encounter: छत्तीसगडमध्ये  3 नक्षलवाद्यांचा खात्मा; आठवड्याभरात 16 जणांना कंठस्नान

छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये सुरक्षादलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये पुन्हा एकदा  चकमक झाली. या चकमकीत 3 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यास सुरक्षादलाच्या जवानांना यश आलं आहे. तेलंगणाच्या सीमेजवळील बीजापूर तालुक्यातील जिल्ह्यातील जंगलात सुरक्षादलाच्या जवानांनी तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या चकमकीत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तसेच घटनास्थळावरून हत्यारे देखील जप्त केले आहेत'. या भागात तीन दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत तीन महिलांसहित कमीत कमी 13 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं होतं. (हेही वाचा - Chhattisgarh News: छत्तीसगडच्या विजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, 13 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले)

या भागात नक्षलविरोधी अभियानांतर्गत नक्षलवाद्यांच्या विरोधात कारवाई सुरु आहे.तीन दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी जंगलात आईईडी स्फोट केला होता. या घटनेत एका कमांडो जखमी झालो होता. त्यानंतर या जंगलात ऑपरेशन सुरु झालं होतं. या भागात 19 एप्रिलला मतदान होणार आहे. गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जंगलात सकाळी सहा वाजता चकमक झाली. त्यानंतर सुरक्षादलाच्या जवानांनी ही कारवाई केली. या कारवाईत सुरक्षादलाच्या जवानानी घटनास्थळावरून नक्षलवाद्यांचे हत्यारे जप्त केले आहेत.

लोकसभा निवडणूकीच्या घोषणेनंतर या परिसरात नक्षलवाद्यांवर वचक ठेवण्यासाठी सुरक्षा दल प्रयत्न करत आहेत.  या भागात 19 एप्रिलला मतदान होणार आहे. सर्व निवडणूक प्रकिया शांतपणे पार पा़डली जावी यासाठी सध्या प्रयत्न केला जात आहे.