
SambhajiNagar Road Accident: संभाजीनगरमध्ये भीषण अपघात झाला आहे. उसाने भरलेला ट्रक पलटी होऊन कोसळला. या दुर्घटनेत ट्रकखाली 17 मजूर अडकले होते. अपघाताची माहिती मिळताच कन्नड शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने 13 कामगारांचे प्राण वाचले. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. जखमी कामगारांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत. कन्नडमधील पिशोरजवळ उसाने भरलेला ट्रक पलटला होता.
रात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. मजूर ट्रकमध्ये उसावर बसून प्रवास करत असताना अचानक पिशोर खांडी येथे ट्रक आणि खाली मजूर अडकले होते. ट्रकमध्ये 17 मजूर होते. ट्रक अचानक उलटला आणि सर्व मजूर खाली अडकले. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर जखमी झाले. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिशोर खांडी, कन्नड, संभाजीनगर येथे उसाने भरलेल्या ट्रकला अपघात झाला. रा