BMC घडवणार  Water Park मध्ये यंदा मुंबई पालिका शाळा विद्यार्थ्यांना मोफत सहल !
BMC School Kids (Photo credit : commons.wikimedia)

शहरातील खाजगी शाळांप्रमाणेच मुंबई महानगरपालिकेच्या ( Brihanmumbai Municipal Corporation School ) शाळांमधील मुलांनादेखील सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी सरकारचे विविध उपक्रम सुरू असतात. शालेय सहल (School Picnic) हा विद्यार्थी जीवनातील असाच एक प्रकार असतो. खाजसी शाळांप्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या शाळांच्या विद्यार्थ्यांनाही तो आनंद लुटता यावा याकरिता शिक्षण समितीने (Education Committee) पुढाकार घेतला आहे.

नुकत्याच झालेल्या शिक्षण समितीची बैठकीमध्ये एकदिवसीय सहलीचा निर्णय घेण्यात आला आहे. इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी पालिकेने एकदिवसीय शालेय सहल आयोजित केली आहे. 26-31 डिसेंबर दरम्यान विरारच्या ग्रेट एक्सकेप वॉटर पार्क (Great Escape water park)  येथे ही सहल असेल. मुंबईतील सुमारे 78,000 विद्यार्थ्यांसाठी आयोजित या एकदिवसीय सहलीसाठी पालिका 4,23,61,000 रूपये खर्च करणार आहे. प्रत्येकी विद्यार्थ्याचा खर्च 543 रूपये असेल.

एकदिवसीय सहल हा एक वार्षिक उपक्रम असतो. मागील वर्षी पालिकेने विद्यार्थ्यांसाठी किडझेनिया थीम पार्क (Kidzania) येथे सहल आयोजित केली होती. खाजगी शाळांप्रमाणे पालिकेच्या विद्यार्थ्यांना महागड्या प्रवेश फीमुळे फिरणं शक्य नसतं. अशावेळी पालिकेकडून आयोजित करण्यात येणार्‍या या वार्षिक सहली त्यांच्यासाठी आनंदाचे आणि नव काही अनुभवण्याचे क्षण नक्की घेऊन येतात.