Vashi Bomb Threat: नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या इनॉर्बिट मॉलमध्ये बॉम्ब असल्याचा मेल(Bomb Threat) प्राप्त झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे इनॉर्बिट मॉल(Inorbit Mall) परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सतर्कतेचे पाऊल म्हणून सध्या संपूर्ण मॉल आणि आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. त्यामुळे मॉलमध्ये आलेल्या नागरिकांमध्ये चिंतेत वातावरण आहे. नवी मुंबई पोलीस (Navi Mumbai Police)आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या तपास यंत्रणांकडून बॉम्ब असल्याबाबत तपासणी सुरू आहे. (हेही वाचा: Mumbai Hospitals Receive Bomb Threats: मुंबईतील 50 हून अधिक रुग्णालयांना बॉम्बच्या धमक्या; व्हीपीएन नेटवर्कवरून आले ईमेल, तपास सुरु)
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईमधील वाशी रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या इनॉर्बिट मॉल प्रशासनाला बॉम्ब असल्याचा मेल आल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. यानंतर नवी मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील 50 हून अधिक हॉस्पिटल्सना बॉम्बच्या धमक्या आल्या होत्या. यात जसलोक हॉस्पिटल, रहेजा हॉस्पिटल, सेव्हन हिल हॉस्पिटल, कोहिनूर हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, जेजे हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटलसह मुंबईतील 50 हून अधिक बड्या हॉस्पिटल्सचा समावेश होता. व्हीपीएन नेटवर्क वापरून धमकीचे ईमेल पाठवले गेले होते. (हेही वाचा:Bomb Threat at Shaniwar Wada: पुण्यातील शनिवाडा मध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीच्या कॉलने खळबळ; बॉम्बस्कॉड कडून शोधकार्य सुरू )
#BREAKING || Navi Mumbai: Vashi's Inorbit mall evacuated after bomb threat email.
@Nilesh_isme shares more details with @Anchoramitaw.#BombThreat #InorbitMall pic.twitter.com/gevqUxAAmw
— TIMES NOW (@TimesNow) August 17, 2024
मात्र, इनॉर्बिट मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर आले होते. पोलीस तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ संपूर्ण मॉल रिकामा केला आहे. सध्या तपास सुरू आहे. तसेच बाँब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पुण्याचं प्रसिद्ध पर्यटनस्थळ आणि शहराची ओळख असलेल्या शनिवार वाडामध्ये ही गेल्या काही दिवसांपूर्वी बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी बॉम्ब स्कॉड पथकाने श्वान पथकांच्या मदतीने सारा परिसर तपासला होता.