
ठाकरे सरकार सत्तेत आल्यावर, ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी टिकास्त्रे सोडायला सुरुवात केली, त्याच पावलावर मिसेस माजी मुख्यमंत्रीही चालू लागल्या. गेल्या काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) आणि ठाकरे सरकार यांच्यामधील ट्वीटर युद्ध सर्वानीच पहिले. मात्र याचा फटका आता अॅक्सिस बँकेला (Axis Bank) होणार आहे. ठाणे महानगरपालिकेतील (TMC) सर्व कर्मचाऱ्यांची अॅक्सिस बँकेत खाती आहे. आता या बँकेतील खाती सरकारी बँकेमध्ये ताबडतोब वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनेचे महापौर नरेश म्हस्के यांनी आज एक तातडीची बैठक बोलावली होती. त्यामध्ये या निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यावर राज्यातील पोलिसांची वेतन खाती अॅक्सिस बँकेकडे वर्ग करण्यात आली होती. मात्र आता ही खाती राष्ट्रीयकृत बँकेत, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये वळवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. याबाबत पहिला निर्णय ठाणे महानगरपालिकेने घेतला आहे. अॅक्सिस बँकेत सध्या ठाणे महानगपालिकेतील एलबीटीचे खाती, टॅक्स खाती आणि कर्मचाऱ्यांचे पगार अशी खाती सध्या अॅक्सिस बँकेत आहे. आता ही सर्व खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळवण्यात येणार आहे. (हेही वाचा: राज्यात एकही डिटेंशन सेंटर होणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाला स्थगिती दिली)
दोन लाख पोलीस कर्मचाऱ्यांची वेतन खाती अॅक्सिस बँकेत आहेत. या खात्यामुळे बँकेत वर्षाला 11 हजार कोटींची उलाढाल होते. मात्र लवकरच बँकेला ही खाती गमवावी लागू शकतात. अमृता फडणवीस अॅक्सिस बँकेत वेस्टर्न इंडियाच्या कॉर्पोरेट हेड म्हणून काम करायच्या. यामुळेच ही सर्व खाती अॅक्सिस बँकेत वळवण्यात आली असल्याचा आरोप याआधी केला गेला होता. आता ठाणे महानगरपालिकेने पुढाकार घेऊन ही खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळवण्याचा नर्णय घेतला आहे.