Baramati Lok Sabha Election 2024: बारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवार यांच्या घरी दाखल
Supriya Sule (PC - Facebook)

Baramati Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तिसऱ्या टप्प्यासाठी आज राज्यातील काही भागांसह देशात मतदान होत आहे. जवळपास सर्वच नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आजूनही काही मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसत आहे. त्यातच बारामतीच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. मतदान केल्यानंतर शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule Visit Ajit Pawar House) या अजित पवार यांच्या काटेवाडी इथल्या घरी दाखल झाल्यात. दरम्यान, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. या दरम्यान, सुप्रिया सुळे यांचे अजित पवार यांच्या घरी जाण्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांची आई काटेवाडीत आहेत. अजित पवार यांच्या आई यांच्या भेटीसाठी सुप्रिया सुळे एकट्याच काटेवाडीत पोहोचल्या आहेत. या भेटीमुळे बारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. सुप्रिया सुळे यांनी मतदान केलं आहे. बारामती पवार विरुद्ध पवार अशी लढाई होत असताना दोन्ही विरोधक एक दिसल्याने मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ पहायला मिळण्याची शक्यता आहे.

प्रचारादरम्यान दोनेही नेत्यांनी एकमेकांवरा आरोप-प्रत्यारोप केले होते.