Photo Credit -Facebook

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सगेसोयऱ्याच्या अटीसह मराठा आरक्षण (Maratha Reservation)मिळावे, या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा 6वा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. बीडचे नवनिर्वाचीत खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. त्यांनी जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ते मध्यरात्री जरांगे यांना भेटण्यासाठी उपोषस्थळी पोहचले होते.

मराठा आरक्षणासाठी आत्तापर्यंत अनेकवेळा मनोज जरांगेंनी उपोषण केले आहे. लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर 8 जून पासून मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरु केले आहे. भेटी दरम्यान, महाराष्ट्रातील सर्व खासदारांना एकत्र करून आपण राज्यपालांची भेट घेणार असल्याचं बजरंग सोनवणे यांनी म्हटले. बजरंग सोनवणे यांनी त्याबाबतचे पत्र राज्यपालांना लिहिले.

पत्रात काय म्हटलयं?

बजरंग सोनवणे यांनी राज्यपाल यांना पत्र लिहीलेल्या पत्रात मनोज जरांगे यांच्या उपोषणाची दखल घेण्याची विनंती केली आहे. 8 जून 2024 पासून मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीत आमरण उपोषणास बसले आहेत. गेल्या पाच दिवसांपासून मनोज जरांगे यांनी अन्न, पाण्याचा त्याग केला आहे. परिणामी त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्याविषयी महाराष्ट्र राज्य शासनाची भूमिका उदासिनतेची दिसून येत आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाने वेळीच दखल न घेतेलस्यास राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तरी याप्रकरणी आपण स्वत: लक्ष घालून मनोज जरांगे यांच्या उपोषणाची दखल घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारला सूचित करावे, असे बजरंग सोनवणे यांनी राज्यपाल यांना पत्रात म्हटले आहे.

आत्तापर्यंत जालना जिल्ह्याचे खासदार डॉ. कल्याणराव काळे, ओमराजे निंबाळकर, कैलास पाटील, अहमदपूर आमदार बाबासाहेब पाटील, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.