अरविंद इनामदार । Photo Credits: Twitter

महाराष्ट्र राज्याचे माजी महासंचालक अरविंद इनामदार (Arvind Inamdar) यांचे मुंबईमध्ये वयाच्या 79व्या वर्षी निधन झाले आहे. कर्तव्यदक्ष पोलिस ऑफिसर अशी ओळख असलेले अरविंद इनामदार त्यांच्या कार्यपद्धतीमुळे चर्चेत होते. जळगाव सेक्स सॅन्डलसह अनेक मोठी प्रकरणं त्यांनी कुशलतेने सांभाळली होती. इनामदार हे 1 ऑक्टोबर 1997 ते 5 जानेवारी 2000 या दरम्यान राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून कार्यरत होते .मुंबईतील हरकिसनदास हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले.

पोलिस खात्यामध्ये चूकीच्या गोष्टींवर बोट ठेवून शासनाविरूद्ध कठोर निर्णय घेण्याचं धाडस अरविंद इनामदार यांनी दाखवलं होतं. त्यांनी कार्यकाळ संपण्याआधी एक वर्ष राजीनामा देऊन पोलिस खात्याला अलविदा म्हटलं होतं. अरविंद इनामदार हे 'एनकाऊंटर स्पेशालिस्ट' होते. त्यानंतर त्यांनी सहाय्यकाच्या रूपात पोलिसांना मार्गदर्शन करण्याचं काम केलं होतं.

ANI Tweet  

पोलिस खात्यामध्ये असूनही हळव्या मनाचे असणारे अरविंद इनामदार हे साहित्य क्षेत्रातही काम करत होते. ते उत्तम लेखक होते.