Arnab Goswami | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

‘रिपब्लिक टीव्ही’चे (Republic TV) संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami यांना अटक केल्यानंतर रायगड पोलिसांनी त्यांना अलिबाग कोर्टासमोर हजर केले. या वेळी न्यायालयाने गोस्वामी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Magisterial Custody) सुनावली. दरम्यान, अर्नब गोस्वामी यांच्या वकीलांनी जामिन मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर आज (5 नोव्हेंबर) सुनावणी होणार आहे.

वास्तुविषारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी कारवाई करत अर्नब गोस्वामी याला काल (बुधवार, 4 ऑक्टोबर 2020) अटक केली. अर्नब गोस्वामी यांच्या राहत्या घरातून त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना अलिबाग कोर्टासमोर हजर करण्यात आले. दरम्यान, याच प्रकरणात पोलिसांनी फिरोज शेख, नितेश सारडा या दोघांनाही अटक केली आहे. अर्नब गोस्वामी यांच्यासह या दोघांच्याही नावाचा उल्लेख अन्वय नाईक यांच्या सुसाईड नोटमध्ये आहे. पोलिसांनी फिरोज शेख, नितेश सारडा यांनाही काल सायंकाळी अटक करुन न्यायालयासमोर हजर केले. (हेही वाचा, Shiv Sena On BJP in Arnab Goswami Arrest Case: नौटंक्यासाठी रडणे, छाती बडवणे बंद करा, शिवसेनेचा भाजपला टोला)

अर्नब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर भारती जतना पक्ष जोरदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, स्मृती इरानी, रविशंकर प्रसाद, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले होते. (हेही वाचा, Arnab Goswami in Maharashtra Police Custody: अर्नब गोस्वामी अटक प्रकरणावर गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजप नेत्यांनी काय दिली प्रतिक्रिया)

काय आहे प्रकरण

रिपल्बिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी मुंबई येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अन्वय नाईक यांनी 5 मे 2018 या दिवशी आत्महत्या केली होती. अलिबाग येथील राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळून आला होता. अन्वय नाईक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांच्या नावाचा उल्लेख होता.