Nitin Kareer (PC - Twitter/@ians_india)

New Chief Secretary Of Maharashtra: महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून IAS अधिकारी नितीन करीर (Nitin Kareer) यांची वर्णी लागली आहे. 1988 च्या बॅचचे IAS अधिकारी नितीन करीर हे महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव (New Chief Secretary Of Maharashtra) असणार आहेत. सध्या ते वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. त्यांनी रविवारी संध्याकाळी माजी मुख्य सचिव मनोज सौनिक (Manoj Saunik) यांच्याकडून पदभार स्वीकारला. मार्चमध्ये निवृत्त होणारे करीर यांना लोकसभा निवडणुकीमुळे आणखी 3 महिन्यांचा कालावधी मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी महसूल आणि नगरविकास खात्यांमध्ये अतिरिक्त मुख्य सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. यापूर्वी त्यांनी भूषवलेल्या विविध महत्त्वाच्या पदांमध्ये माहिती आणि जनसंपर्क महासंचालक पदाचा समावेश आहे.

राज्य सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौनिक यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला होता, परंतु त्यावर अनुकूलपणे विचार केला गेला नाही. रविवारी निवृत्त झालेले सौनिक हे महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा -Maharashtra New DGP: पोलीस महासंचालक रजनीश शेठ निवृत्त, विवेक फणसाळकरांकडे अतिरिक्त कार्यभार)

तथापी, करीर यांच्या नियुक्तीमुळे, 1987 च्या IAS बॅचच्या आणि सध्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत असलेल्या सुजाता सौनिक या वरिष्ठ IAS अधिकारी, यांची महाराष्ट्राची पहिली महिला CS बनण्याची संधी हुकली आहे.

तथापी, रविवारी राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ शासकिय सेवेतून निवृत्त झाले. त्यानंतर राज्याच्या पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार बृहन्मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे तात्पुरता सोपवण्यात आला आहे. यासंदर्भात राज्याच्या गृहविभागाने निवेदनाद्वारे माहिती दिली आहे.