मेळघाट वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण (Deepali Chavan Suicide Case) दिवसेंदिवस अधिकाधिक चिघळत चालले आहे. त्याचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटू लागले आहेत. दिपाली चव्हाण यांनी स्वत:वर पिस्तूलातून स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केल्याची घटना पुढे आली. तसेच घटनास्थळी त्यांनी लिहिलेली 9 पानांची चिठ्ठी देखील समोर आली. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने मेळघाट वनक्षेत्राचे माजी प्रादेशिक संचालक एमएस रेड्डी यांना निलंबित केले. मात्र या सर्व गोष्टीला विलंब झाल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाराजी व्य्कत केली. तसेच या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची नियुक्ती करण्याची मागणी देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारकडे केली. अशा आशयाचे पत्र त्यांनी लिहिले आहे.
"दिपाली चव्हाण प्रकरणात चौकशीसाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकार्यांची तत्काळ नियुक्ती करा, जलदगती न्यायालयात खटला चालवा आणि विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करा" अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.हेदेखील वाचा- Deepali Chavan Suicide: वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांची आत्महत्या, पिस्तूलातून स्वत:वर झाडली गोळी
दीपाली चव्हाण प्रकरणात चौकशीसाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकार्यांची तत्काळ नियुक्ती करा, जलदगती न्यायालयात खटला चालवा आणि विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करा ❗️ pic.twitter.com/Ix3o7oFukO
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 2, 2021
"अवघ्या 28 वर्षांच्या वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते, आरोप ज्यांच्यावर आहेत, त्यांची केवळ बदली होते. आंदोलनं झाल्यानंतरच अपर मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांचे निलंबन होते. खरे तर फौजदारी कारवाई सुरू असताना खातेनिहाय चौकशी आवश्यक असते. पण, तसे आदेश न काढता अंतर्गत चौकशी समिती नेमण्याचा घाट. प्रत्येक टप्प्यासाठी आंदोलन. त्याशिवाय सरकार हलत नाही. आम्हाला प्रश्न पडला आहे की, प्रत्येक आरोपित व्यक्तीचा बचाव-संरक्षण करण्याचाच या मविआ सरकारचा अट्टाहास का?" अस सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.