महाराष्ट्र

Matheran Shocker: माथेरानला फिरण्यासाठी गेलेले जोडपे बेपत्ता, पाच दिवसांनी सापडला मृतदेह, पोलिसांचा तपास सुरु

Pooja Chavan

माथेरान येथे फिरण्यासाठी आलेल्या रस्त्नागिरितील दाम्प्त्याचा अखेर मृतदेह आढळून आला आहे.पार्थ काशिनाथ भोगटे आणि त्यांची पत्नी श्री लक्ष्मी पार्थ भोगटे अशी मृतांची नावे आहे.

Mumbai Pune Express Highway Accident: पंढपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसचा अपघात, 5 वारकऱ्यांचा जागीच मृत्यू

Pooja Chavan

पंढपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसाचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर झाला आहे. बस डोंबिवलीवरून पंढपूरला जात होती. या भीषण अपघातात ५ भाविकांचा मृत्यू झाला. तर आठ जण गंभीर जखमी झाले.

Educational Scholarship For Hindu Students: मुंबईमधील महालक्ष्मी मंदिराने पुन्हा सुरु केली हिंदू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती; जाणून घ्या सविस्तर

Prashant Joshi

शुक्रवारी, मंदिर ट्रस्टने जाहीर केले की, ते गरीब आणि होतकरू हिंदू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देईल. शिष्यवृत्ती प्राप्त करू इच्छिणारे विद्यार्थी मंदिराच्या प्रशासन कार्यालयात विनामूल्य अर्ज करू शकतात.

Pune Bus Accident Video: भोर एसटी स्थानकात तरुणाचा अपघाती मृत्यू, धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद

Amol More

रुपेश गायकवाड तरुण बसच्या समोरून डाव्या बाजूनं पलीकडे उजव्या बाजूला जात असताना अचानक बस चालकाने बस पुढं घेतली. यावेळी बसचं चाक अंगावरून गेल्यानं रुपेश याचा मृत्यू झाला.

Advertisement

Ashadhi Ekadashi 2024: विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी VIP नाही तर, वारकरी व शेतकऱ्यांना प्राधान्य; भाविकांना मोफत पाणी बॉटल व मँगो ज्यूस, आषाढी एकादशीसाठी पंढरपूर प्रशासन सज्ज

टीम लेटेस्टली

आषाढी एकादशी साठी पोलीस विभागाने वाहतुकीचे योग्य नियोजन करावे. पंढरपूर शहरात आलेल्या वारकरी व भाविकांना आपल्या वाहनाच्या ताफ्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता पोलीस विभागाने घ्यावी. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

Nashik Anjaneri Fort: अंजनेरी गडावर अडकलेल्या 200 जणांची सहा तास रेस्क्यू ऑपरेशननंतर सुटका

Amol More

या पर्यटकांसाठी सहा तास रेस्क्यू ऑपरेशन राबवल्यानंतर आता त्यांची सुटका करण्यात यश आलं आहे.

IAS Puja Khedkar: पूजा खेडकर बाबत आणखी एक खुलासा; MBBS प्रवेशासाठी घेतला होता OBC कोट्याचा लाभ, महाविद्यालय संचालकांनी सांगितले, '2007 मध्ये कोणतेही अपंगत्व नव्हते'

Bhakti Aghav

वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेताना पूजा खेडकर यांननी स्वत:ला तंदुरुस्त घोषित केले होते. तसेच आयएएसची नोकरी मिळविण्यासाठी त्यांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Maharashtra Rain Update: भारतीय हवामान खात्याकडून उद्या रायगडसाठी रेड, तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातार, कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी

Prashant Joshi

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील अनेक नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. रत्नागिरी, रायगडमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर असून अनेकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. सावित्री नदीला पूर आला असून पुढील काही तास पाऊस सुरू राहिल्यास नदी पुराची पातळीही ओलांडू शकते.

Advertisement

New Agitation Strategy by Congress: विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्यासाठी कॉंग्रेस करणार वेगळ्या पद्धतीचे आंदोलन; मागितला जाणार सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या महामंडळांचा हिशेब

Prashant Joshi

काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, सरकार या महामंडळांना विविध प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपये मंजूर करते; गेल्या पाच वर्षांत त्यांनी काय काम केले हे पक्षाला जाणून घ्यायचे आहे. महायुतीच्या काळात राज्याची आर्थिक स्थिती बिघडली आहे, हे राज्याच्या आर्थिक पाहणीत स्पष्ट झाले आहे, असे काँग्रेसने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Weather Forecast For Tomorrow: देशात उद्याचे हवामान कसे? जाणून 16 जुलै रोजीचा अंदाज

Shreya Varke

देशात उशिराने मान्सून सक्रिय झाला आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि केरळसह काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणासह काही राज्यांमध्ये पावसाने नक्कीच हजेरी लावली आहे. प्रमुख राज्यांतील लोक अजूनही उष्णतेने हैराण आहेत आणि वेळेवर शेती करू शकत नाहीत. देशात पाऊस पडणार की नाही याबाबत भारतीय हवामान विभागाकडून (IMD) विशेष माहिती देण्यात आली आहे.

Mumbai Dam Water Level: मुंबईच्या 7 धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा आजची आकडेवारी

Amol More

मुंबई महानगर पालिकेने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा 35.11 टक्के इतका झाला आहे. 15 जुलै रोजी सकाळी 6 वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा 5,08,108 दशलक्ष लिटर इतका झाला.

Swami Avimukteshwaranand: स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना यूबीटी नेते Uddhav Thackeray यांची भेट, Watch Video

Prashant Joshi

उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांनी स्वामींची पूजा केली. या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, 'महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला आहे. त्यांच्या विश्वासघाताने आम्ही दु:खी आहोत.'

Advertisement

Shankaracharya Avimukteshwaranand On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांच्यासोबत 'विश्वासघात' झाला; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद

अण्णासाहेब चवरे

ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती (Swami Avimukteshwaranand Saraswati) यांनी नुकतीच शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विनंतीवरून त्यांचे निवासस्थान 'मातोश्री' येथे मुंबईत भेट दिली. त्यानंतरत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठिंबा दर्शवला.

Amravati Shocking: अमरावतीत पावसाने केला कहर! 14 वर्षांचा मुलगा गेला वाहून

Shreya Varke

संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे. विदर्भातील अमरावतीमध्येही पाऊस सुरू आहे. अशा परिस्थितीत अमरावती येथून दोन वेगवेगळे अपघात समोर आले आहेत. ज्यात एक 14 वर्षांचा मुलगा नाल्यात वाहून गेला तर दोन महिलांना विजेचा धक्का बसला. त्यामुळे दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

Pune News: हातोडा डोक्यात मारुन एकाची हत्या, जेवण न आवडल्याने कृत्य; पुणे यथील घटना

अण्णासाहेब चवरे

पुणे (Pune Crime) येथील कोंढवा (Kondhwa) परिसरातील उंड्री येथे एकाची डोक्यात हातोडा मारुन हत्या करण्यातत आली आहे. पीडित व्यक्ती हा हा बांधकाम मजूर आहे. ही घटना एका नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात घडली. शुभम शास्त्री सरकार (वय 63, रा. पश्चिम बंगाल) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

NDRF Team Deployed in Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात एनडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात; नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी (Watch Video)

Jyoti Kadam

मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. एनडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सतर्कतेची पावले म्हणून रत्नागिरीतील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Advertisement

Weather Forecast In India: महाराष्ट्र, गोवा, केरळसाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी; दिल्लीत हलका पाऊस पडण्याची शक्यता

Bhakti Aghav

मुंबई, ठाणे, पालघर आणि धुळे येथे आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय, महाराष्ट्रात विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. ठाण्यातील भिवंडी परिसरातील कामवारी नदी रविवारी ओसंडून वाहत असल्याने नदीकाठावर राहणाऱ्या लोकांच्या घरात पाणी शिरले आहे.

Dombivali: भाजी विकणाऱ्या ठोंबरे मावशींचा मुलगा योगेश झाला C.A, मेहनतीच्या जोरावर मिळवले यश

Shreya Varke

डोंबिवली पूर्व येथील गांधीनगर मधील गिरनार मिठाई दुकानाजवळ भाजी विकणाऱ्या ठोंबरे मावशींचा मुलगा योगेश चार्टर्ड अकाऊंटंट (C.A.) झाला आहे. निश्चय, मेहनत आणि परिश्रमांच्या बळावर योगेशने खडतर परिस्थितीशी तोंड देत हे दैदीप्यमान यश मिळवलं आहे.

Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar: शरद पवार यांच्यासोबत काय चर्चा झाली? छगन भुजबळ यांनी दिली सविस्तर माहिती

अण्णासाहेब चवरे

छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांचे निवासस्थान सिल्वर ओक येथे सोमवारी (15 जुलै) सकाळी अचानक दाखल झाले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांतून या भेटीची जोरदार चर्चा सुरु होती. राज्याच्या राजकीय वर्तुळातही या भेटीमुळे जोरदार खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन भुजबळ यांनी खुलासा केला.

IAS Pooja Khedkar Family Absconding: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे पालक फरार, पुणे पोलिसांकडून शोध सुरू

टीम लेटेस्टली

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस त्यांच्या घरी गेले असता आरोपी फरार असल्याचे त्यांच्या आढळळे. पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे फोन बंद होते. घरी कोणी नव्हते.

Advertisement
Advertisement