Mumbai Dam Water Level: मुंबईच्या 7 धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा आजची आकडेवारी

15 जुलै रोजी सकाळी 6 वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा 5,08,108 दशलक्ष लिटर इतका झाला.

Vaitarna Dam

मुंबईवरील पाणीसंकट दूर होण्याची शक्यता आहे. कारण मुसळधार पावसामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मुंबईतील मुसळधार पावसामुळे धरणामधील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईमध्ये सध्या असेलली 10 टक्के पाणीकपात आता रद्द केली जाण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - Mumbai High Tide Timing Today: मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट; समुद्रकिनारी जात असाल तर भरतीची वेळ घ्या पाहून)

मुंबई महानगर पालिकेने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा 35.11 टक्के इतका झाला आहे. 15 जुलै रोजी सकाळी 6 वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा 5,08,108 दशलक्ष लिटर इतका झाला. सर्वच धरणांमध्ये एकूण 35.11 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. काल सातही धरणात 30 टक्के पाणीसाठा होता. एकाच दिवसात मुंबईच्या पाणीसाठ्यात 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या 5 धरण आणि 2 तलावांमधून पाणी पुरवठा केला जातो. यासातही धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढत आहे. या सातही धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर इतकी असून आता धरणांत 3 लाख 61 हजार 825 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. यंदा जूनमध्ये समाधानकारक पाऊस न पडल्याने मुंबईकरांना पाणी चिंतेने ग्रासले होते. तसेच, धरणांनी तळ गाठल्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याच्या पुरवठ्याच्या नियोजनासाठी महानगरपालिकेने 5 जूनपासून दहा टक्के पाणीकपात लागू केली होती.

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif