Weather Forecast In India: महाराष्ट्र, गोवा, केरळसाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी; दिल्लीत हलका पाऊस पडण्याची शक्यता

याशिवाय, महाराष्ट्रात विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. ठाण्यातील भिवंडी परिसरातील कामवारी नदी रविवारी ओसंडून वाहत असल्याने नदीकाठावर राहणाऱ्या लोकांच्या घरात पाणी शिरले आहे.

Image Credit: ANI

Weather Forecast In India: देशाच्या अनेक भागांत मुसळधार पावसा (Heavy Rain) मुळे पूरसदृश परिस्थितीही पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक राज्यांमध्ये लोकांची घरे पाण्याखाली गेली आहेत. पावसाबाबत IMD कडून इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) म्हटले आहे की, मान्सून खाली सरकण्यास सुरुवात झाली आहे. या आठवड्यात केरळ, कर्नाटक आणि कोकण गोव्याच्या किनारपट्टीकडे मान्सूनचा जोर वाढेल. येत्या काही दिवसांत या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळे येण्याची शक्यता आहे.

रत्नागिरीत IMD ने जारी केला रेड अलर्ट जारी -

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, अमरावती, वर्धा आणि यवतमाळसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि धुळे येथे आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय, महाराष्ट्रात विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. ठाण्यातील भिवंडी परिसरातील कामवारी नदी रविवारी ओसंडून वाहत असल्याने नदीकाठावर राहणाऱ्या लोकांच्या घरात पाणी शिरले. (हेही वाचा -Mumbai High Tide Timing Today: मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट; समुद्रकिनारी जात असाल तर भरतीची वेळ घ्या पाहून)

गोव्यात शाळा बंद -

गोव्याच्या शिक्षण विभागाने 12वी पर्यंतच्या शाळांना सोमवार, 15 जुलै रोजी सुट्टी जाहीर केली. गोव्यात किनारपट्टीच्या भागात मुसळधार पाऊस पडत आहे. याठिकाणी IMD ने राज्याच्या काही भागात रेड अलर्ट जारी केला आहे. (हेही वाचा - Ratnagiri Rain Update: मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे ठप्प; रत्नागिरीतील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी)

केरळमध्ये रेड अलर्ट जारी -

याशिवाय, IMD ने सोमवारी केरळमधील मलप्पुरम, कन्नूर आणि कासारगोडसाठी रेड अलर्ट आणि एर्नाकुलम, त्रिशूर, पलक्कड, कोझिकोड आणि वायनाडसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला. मुसळधार पाऊस आणि वादळामुळे केरळमधील सहा जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालये 15 जुलै रोजी बंद राहतील. (हेही वाचा:Kokan Rain News Update: कोकणात मुसळधार पाऊस,रायगड-रत्नागिरीला रेड अलर्ट )

हवामान खात्याने आपल्या अपडेटमध्ये सांगितलं आहे की, केरळ, कर्नाटक आणि गोव्याच्या काही भागांमध्ये येत्या काही दिवसांत 20 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडेल. दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

चार जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर आयएमडीने मुंबई आणि पालघरमध्ये यलो अलर्ट तर ठाणे, रायगड आणि पुणे येथे ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सतत पाऊस आणि वादळामुळे मुंबईच्या उपनगरी भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे वृत्त आहे.

दिल्ली NCR मध्ये हलका पाऊस -

आयएमडीने सांगितले की, येत्या काही दिवसांत दिल्ली एनसीआरमध्ये हलका पाऊस आणि मध्यम वारे वाहण्याची शक्यता आहे. परंतु राष्ट्रीय राजधानीसाठी कोणताही इशारा जारी करण्यात आलेला नाही. शनिवारी सकाळी दिल्लीतील अनेक भागात पाऊस झाल्याने पाणी साचले आणि वाहतूक कोंडी झाली.