Dombivali: भाजी विकणाऱ्या ठोंबरे मावशींचा मुलगा योगेश झाला C.A, मेहनतीच्या जोरावर मिळवले यश

डोंबिवली पूर्व येथील गांधीनगर मधील गिरनार मिठाई दुकानाजवळ भाजी विकणाऱ्या ठोंबरे मावशींचा मुलगा योगेश चार्टर्ड अकाऊंटंट (C.A.) झाला आहे. निश्चय, मेहनत आणि परिश्रमांच्या बळावर योगेशने खडतर परिस्थितीशी तोंड देत हे दैदीप्यमान यश मिळवलं आहे.

डोंबिवली पूर्व येथील गांधीनगर मधील गिरनार मिठाई दुकानाजवळ भाजी विकणाऱ्या ठोंबरे मावशींचा मुलगा योगेश चार्टर्ड अकाऊंटंट (C.A.) झाला आहे. निश्चय, मेहनत आणि परिश्रमांच्या बळावर योगेशने खडतर परिस्थितीशी तोंड देत हे दैदीप्यमान यश मिळवलं आहे. त्याच्या या यशामुळे आलेले मावशींचे आनंदाश्रू पाहून तुम्हीही भावूक व्हाल हे नक्की आहे. C.A. सारखी अवघड परीक्षा पास करणाऱ्या योगेशचे कौतुक करावे तितके कमीच आहे. योगेशच्या या यशाबद्दल एक मंत्री रविंद्र चव्हाण यांना पोस्ट शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.

पाहा पोस्ट:

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement