Swami Avimukteshwaranand: स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना यूबीटी नेते Uddhav Thackeray यांची भेट, Watch Video
उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांनी स्वामींची पूजा केली. या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, 'महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला आहे. त्यांच्या विश्वासघाताने आम्ही दु:खी आहोत.'
Swami Avimukteshwaranand Meets Uddhav Thackeray: ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी आज 'मातोश्री' येथे शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांनी स्वामींची पूजा केली. या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, 'महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला आहे. त्यांच्या विश्वासघाताने आम्ही दु:खी आहोत. जोपर्यंत ते पुन्हा मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत आमचे दु:ख दूर होणार नाही.'
ते पुढे म्हणाले, 'कोणाचे हिंदुत्व खरे आहे हे जाणून घेतले पाहिजे." जो विश्वासघात करतो तो हिंदू असू शकत नाही. जो विश्वासघात सहन करतो तो हिंदू असला पाहिजे कारण त्याचा विश्वासघात झाला आहे. ज्यांनी विश्वासघात केला ते हिंदू कसे असू शकतात? जोपर्यंत तुम्ही पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत नाही, तोपर्यंत आमच्या हृदयातील वेदना कमी होणार नाहीत.'
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)