Maharashtra Rain Update: भारतीय हवामान खात्याकडून उद्या रायगडसाठी रेड, तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातार, कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी
रत्नागिरी, रायगडमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर असून अनेकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. सावित्री नदीला पूर आला असून पुढील काही तास पाऊस सुरू राहिल्यास नदी पुराची पातळीही ओलांडू शकते.
Maharashtra Rain Update: भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार उद्या राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने उद्यासाठी रायगडसाठी रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातार, कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील अनेक नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. रत्नागिरी, रायगडमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर असून अनेकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. सावित्री नदीला पूर आला असून पुढील काही तास पाऊस सुरू राहिल्यास नदी पुराची पातळीही ओलांडू शकते. त्यामुळे आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. एनडीआरएफची टीम सावित्री नदीच्या पाणीपातळीवरही लक्ष ठेवून आहे. यावेळी दरड प्रवण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी व स्वत:हुन सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. तसेच मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. (हेही वाचा: Weather Forecast For Tomorrow: देशात उद्याचे हवामान कसे? जाणून 16 जुलै रोजीचा अंदाज)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)