NDRF Team Deployed in Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात एनडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात; नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी (Watch Video)

एनडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सतर्कतेची पावले म्हणून रत्नागिरीतील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

NDRF Team Deployed in Ratnagiri: मुसळधार पावसामुळे जगबुडी आणि वाशिष्ठी नद्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. तेथे कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात एनडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. रत्नागिरीतील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राजापूर येथील कोदवली नदी, लांजा येथील मुचकुंदी नदी यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून सतर्कतेची पावले उचलण्यात आली आहेत. (हेही वाचा:Ratnagiri Rain Update: मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे ठप्प; रत्नागिरीतील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी )

व्हिडीओ पहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)