Pune Bus Accident Video: भोर एसटी स्थानकात तरुणाचा अपघाती मृत्यू, धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद
रुपेश गायकवाड तरुण बसच्या समोरून डाव्या बाजूनं पलीकडे उजव्या बाजूला जात असताना अचानक बस चालकाने बस पुढं घेतली. यावेळी बसचं चाक अंगावरून गेल्यानं रुपेश याचा मृत्यू झाला.
पुण्यातील (Pune News) भोरमध्ये एसटी बस स्थानकात (Bhor ST Stand) चाकाखाली चिरडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रुपेश गायकवाड असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. सोमवारी दुपारी ही घटना घडली आहे. बस स्थानकात असलेल्या cctv मध्ये ही घटना कैद झाली आहे. रुपेश गायकवाड तरुण बसच्या समोरून डाव्या बाजूनं पलीकडे उजव्या बाजूला जात असताना अचानक बस चालकाने बस पुढं घेतली. यावेळी बसचं चाक अंगावरून गेल्यानं रुपेश याचा मृत्यू झाला.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)