बदलापूर (Badlapur) मध्ये आदर्श विद्या मंदिर (Adarsh Vidya Mandir) शाळेत लहान मुलींवर लैंगिक अत्याचार (Badlapur School Sexual Assault Case) केल्या प्रकरणी अटकेत असलेल्या अक्षय शिंदे (Akshay Shinde) या आरोपीचा 23 सप्टेंबरला एन्काऊंटर मध्ये मृत्यू झाला आहे. सध्या या एन्काऊंटर (Encounter) वरून अनेक चर्चा आणि सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये API निलेश मोरे यांची भेट घेतली आहे. सोबतच पोलिसांचं आणि अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचं समर्थन केलं आहे.
शर्मिला ठाकरे यांनी केलं एन्काऊंटरचं समर्थन
शर्मिला ठाकरे यांनी निलेश मोरेंची भेट घेतल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना एक मेसेज वाचून दाखवला. 'अक्षय शिंदे च्या एन्काऊंटर बद्दल पोलिसांचं अभिनंदन आणि जर तो जाणून बुजून केला असेल तर डबल अभिनंदन' असा हा फॉर्वर्ड होता. दरम्यान आपल्याला महिला म्हणून याबाबत समाधान आहे. 'बलात्कारी पुरूषी समाजावर वचक ठेवायचा असेल तर असे एन्काऊंटर वरचेवर झाले पाहिजेत.' अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी दिली आहे.
View this post on Instagram
संजय राऊत यांना टोला
हैदराबाद मध्ये 4 आरोपींचा तेथील पोलिसांनी एन्काऊंटर केला होता तेव्हा ज्यांनी त्यांच्या पेपर मध्ये हैदराबाद पोलिसांचं कौतुक केले होते ते आज महाराष्ट्राच्या पोलिसांचं समर्थन करू शकत नाहीत? हा न्याय वेगळा कसा असू शकेल? असा सवाल त्यांनी संजय राऊतांचं नाव न घेता केला आहे. Badlapur Sexual Assault: शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांच्याकडून अक्षय शिंदे एन्काऊंटरमध्ये जखमी पोलीस कर्मचाऱ्याची भेट .
दरम्यान आज काळाची गरज पाहता कायदा वेगवान होण्याची गरज बोलून दाखवली आहे. ब्रिटीश कालीन कायदे आता बदलण्याची गरज आहे. वाढत्या अत्याचाराच्या घटना पाहता अशा गुन्ह्यांमध्ये 2-3 महिन्यात निकाल लागणं आवश्यक आहे. असा शक्ती कायदा अभिप्रेत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.