Mumbai Airport (PC - Wikimedia commons)

मुंबई विमानतळावरील एअर इंडिया एक्स्प्रेसच्या काउंटरवर एका म घडली आहे. या घटनेनंतर सदर महिलेला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. रविवारी ही घटना घडली. एअर इंडिया एक्सप्रेसचे प्रवक्ते म्हणाले, "1 सप्टेंबर रोजी, मुंबई विमानतळावर एका प्रवाशाने आमच्या ग्राउंड ऑपरेशन पार्टनरच्या स्टाफ सदस्यासोबत गैरवर्तन केले. ड्युटी मॅनेजरने तातडीने CISF ला सूचित केले आणि प्रवाशाला मानक कार्यप्रणालीनुसार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले," एअर इंडिया एक्सप्रेसचे प्रवक्ते म्हणाले. मंगळवारी या संदर्भातले एक निवेदन काढण्यात आले आहे. (हेही वाचा - Air India-Vistara Merger: विस्तारा एअरलाईन्स विमानाचे बुकींग 12 नोव्हेंबरपासून बंद, Air India कंपनीत होणार विलिनीकरण)

यातील प्रवासी आणि कर्मचारी महिला असल्याचे माहितीच्या सूत्राने सांगितले.  प्रायॉरिटी बोर्डिंगच्या मुद्द्यावरून प्रवासी आणि कर्मचारी यांच्यात वादावादी झाली. आणखी एक सहप्रवासी तिच्या चेक-इन प्रक्रियेतून जात असल्याने महिला प्रवाशाला प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आले. थोडावेळ थांबायला सांगितल्याने संतप्त झालेल्या प्रवाशाने शिवीगाळ केली आणि एअरलाइन्स कर्मचाऱ्यांना मारहाण केली.

अनियंत्रित प्रवाशांच्या वर्तनाच्या हाताळणीसाठी नागरी विमान वाहतूक नियामक महासंचालक (DGCA) द्वारे जारी केलेल्या "अनियमित प्रवाशांच्या हाताळणी" वर नागरी विमान वाहतूक आवश्यकता (CAR) द्वारे मार्गदर्शन केले जाते.

DGCA च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, “प्रवाशाच्या अनियंत्रित वर्तनामध्ये दारू किंवा ड्रग्जचे सेवन, ज्यामुळे व्यत्यय आणणारे वर्तन, धूम्रपान, पायलटच्या सूचनांचे पालन न करणे, धमकावणे किंवा अपमानास्पद भाषा वापरणे, शारीरिकरित्या धमकावणे किंवा अपमानास्पद वर्तन करणे, क्रू ड्युटीमध्ये हेतुपुरस्सर हस्तक्षेप करणे, यांचा समावेश होतो परंतु इतकेच मर्यादित नाही. आणि विमानाची सुरक्षितता धोक्यात आणते”.