PMC Bank प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया; विधानसभा निवडणुकीनंतर ठेवीदारांचे अडकलेले पैसे मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारशी बोलणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Photo Credits: PTI)

पीएमसी बॅंक घोटाळ्यात (PMC Bank Crisis) अनेक लोकांची नावे समोर आली आहेत. त्याचबरोबर याप्रकरणी आरोपींना अटक करुन त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई सुरु आहे. दरम्यान, पीएमसी बॅंकेतील ठेवीदारांकडून मुंबई एस्प्लानेड न्यायालयाबाहेर मोठ्या संख्येने गर्दी करुन निर्दशने करण्यात आली आहे. या प्रकरणात महाराष्ट्राचे (Mahashtra) मुख्यमंत्री देवेंद्र फणडवीस (Devendra Fadnavis) यांनीही उडी घेतली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर (Maharshtra Assembly Election 2019) पीएमसी बॅंकेतील ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देऊअसे अश्वासन फडणवीस यांनी दिले आहे. ते स्वत: या प्रकरणाचा पाठपुरावा करतील असेही फडणवीस म्हणाले आहेत.

पीएमसीकडून एचडीआयएलला कर्ज देण्यात आले होते, मात्र एचडीआयएलने कर्जाची रक्कम वेळेत न भरल्याने पीएमसी बँक आणि बँकेतील ठेवीदार आता अडचणीत आले आहेत. यामुळे आपण बॅंकेत ठेवलेले पैसे परत मिळावे, यासाठी ठेवीदारांकडून निर्दशन करण्यात आले आहे. परंतु, देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. "निवडणूक झाल्यानंतर आम्ही हा मुद्दा केंद्राकडे नेणार आहोत. ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी आम्ही केंद्राला विनंती करु. मी स्वत: या प्रकरणाचा पाठपुरावा करेल", असे फडणवीस म्हणाले आहेत. हे देखील वाचा- पीएमसी बॅंक घोटाळा: मुंबईतील पीएमसी बॅंक ठेविदार संजय गुलाटी यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू, सोमवारी कोर्टाबाहेर केले होते निदर्शन

याआधी पीएमसी बॅंकेच्या ठेवीदारांनी ठाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. ठाण्यात पालिका मुख्यालयाबाहेर ठेवीदारांनी मुख्यमंत्र्यांना गाठले. त्यावेळी माजी खासदार किरीट सोमय्या देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर लगेच नरेंद्र मोदी यांच्यासोबत याविषयी चर्चा केली जाईल असे आश्वासन खातेदारांना दिले होते. त्याचबरोबर ठेवीदारांना त्यांचे संपूर्ण पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, असेही फडणवीस यावेळेस म्हणाले.