FDA धाडीनंतर 'येवले अमृततुल्य' बंद होणार? पहा संचालक नवनाथ येवले यांचा खुलासा (Watch Video)
Yewale Amrutalay (Photo Credits: Facebook)

येवले अमृततुल्य हा पुण्यातील चहा आता बघता बघता महराष्ट्रभर प्रसिद्ध झाला आहे. मात्र काही दिवसांपूर्वी 'येवले अमृततुल्य'(Yewale Amruttulya) वर एफडीएने धाड टाकत शरीराला अपायकारक 'मेलामाईन' पदार्थांचा वापर करत असल्याचा दावा करण्यात आला होता. लवकरच येवले अमृततुल्यचे उत्पादन थांबवले जाणार आहे अशा प्रकारचे वृत्त सध्या सोशल मीडियामध्ये झपाट्याने व्हायरल होत आहेत. मात्र एका खास व्हिडिओ पोस्ट द्वारा येवले अमृततुल्यचे मालक नवनाथ येवले (Navnath Yewale) यांनी काही दिशाभूल करणार्‍या बातम्या मुद्दामून पसरवल्या जात असल्याचं सांगत ग्राहकांनी खोट्या बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. तसेच भविष्यात पुणे सह राज्यभर सार्‍या फ्रेंचाईजीस नियमित सुरू राहणार असल्याचंही म्हटलं आहे.

येवले चहा’ची चहा पावडर, साखर, चहाचा मसाला असा एकूण सहा लाख रुपये किमतीचा साठा पुण्यातून जप्त करण्यात आला आहे. विक्रीसाठी पॅकबंद करुन ठेवण्यात आलेला माल अन्न आणि औषध प्रशासनाने जप्त केला होता असं सांगण्यात आले होते, मात्र आज नवनाथ येवले यांनी एफडीएने त्यांच्या कारखान्यावर केलेल्या कारवाईमध्ये पाकिटावर काही गोष्टींमध्ये त्रृटी आढळून आल्या. मात्र त्याची पूर्तता करण्यात आल्याने ही सेवा बंद केली जाणार नाही असं सांगण्यात आले आहे.

पहा काय आहे नवनाथ येवले यांचं स्पष्टीकरण?

टेलिव्हिजनवर दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध केल्याचा आरोपावरून 'येवले चहा’ला नोटीस बजावली होती. या प्रकरणी ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड कौन्सिल ऑफ इंडियाकडे तक्रार करण्यात आली होती. चहा तयार करण्यासाठी मिनरल वॉटर वापरलं जात असून चहामुळे पित्त होत अशाप्रकारची जाहिरात केल्याने एफडीएने कारवाई करत त्यांच्या कारखान्याला भेट दिली होती. मात्र आता त्रृटींची पुर्तता करण्यात आली आहे असं सांगण्यात आलं आहे.