मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) मध्यरात्री एका खासगी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. रत्नागिरीहून (Ratnagiri) मुंबईच्या (Mumbai) दिशेने निघालेल्या चालत्या बसने अचानक (Bus Caught Fire) पेट घेतला. मात्र, तरुणाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील 19 प्रवाशी सुखरुप बचावले आहेत. रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने गेलेल्या खाजगी बसने महाड जवळच्या सावित्री पुलाजवळ पेट घेतला. या बसमधील 19 प्रवाशी सुदैवाने बचावले आहे. (हेही वाचा - Mumbai Shocker: दहिसर-बोरीवली स्टेशन ब्रीज मागे नाल्यात पडून 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू)
मध्यरात्री 1.45 वाजता बसमधील सर्व प्रवासी गाढ झोपेत असताना धावत्या बसच्या टायरने अचानक पेट घेतला. टायरने पेट घेतल्यानंतर काही क्षणात बस आगीच्या भक्षस्थानी गेली. बसला आग लागली त्यावेळी बसमधून एकून 19 प्रवासी प्रवास करत होते. बसच्या टायरला आग लागल्याची बाब तरुणाच्या लक्षात आलं आणि त्याच्या प्रसंगावधानामुळे बसमधील इतर प्रवाशांचे प्राण वाचले.
बसमधील सर्व सामान जळून खाक झालं असून लाखो रुपयांची हानी झाली आहे. सुदैवाने 19 प्रवासी बचावले. बसच्या टायरला आग लागली आणि पुढील काही क्षणात बस आगीच्या भक्षस्थानी गेली. एका विद्यार्थ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील 19 प्रवासी, दोन ड्रायव्हर आणि एक क्लिनरचा जीव वाचला. सर्वजण गाढ झोपेत असताना बसच्या टायरने अचानक पेट घेतला.