Palghar: मद्यधुंद अवस्थेत अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक निलंबित
Hangover (Photo Credit: PIxabay)

महाराष्ट्रातील पालघर (Palghar) जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील (Zilla Parishad School) एका शिक्षकाला (Teacher) शैक्षणिक संस्थेत मद्यपान केल्याच्या आरोपाखाली आणि एका झेडपी पदाधिकाऱ्याला मारहाण (Beating) केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले.  डहाणू (Dahanu) तालुक्यातील धामणगाव (Dhamangav) येथील प्राथमिक शाळेत काम करणारा शिक्षक शाळेत झोपलेला आणि इतरांना शिवीगाळ करताना आढळला होता, असे जिल्हा परिषदेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. शिक्षकाविरुद्धच्या तक्रारीनंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्याला 22 नोव्हेंबरपासून निलंबित केले आहे. हेही वाचा  Pune: इंजेक्शन देऊन बायकोची हत्या, पुणे येथील रुग्णालय कर्मचाऱ्याचे कृत्य

सेवा नियमातील तरतुदींच्या अनुषंगाने जारी करण्यात आलेल्या निलंबनाच्या आदेशात असेही म्हटले आहे की, निलंबनाच्या कालावधीत शिक्षक मुख्यालय सोडणार नाहीत आणि इतर कोणतीही नोकरी घेणार नाहीत.