
क्रुएलिटी टू अॅनिमल कायद्यांतर्गत (Cruelty to Animals Act) मुंबई येथील चेंबूर परिसरातील 40 वर्षीय व्यक्ती दोषी आढळला आहे. मे महिन्यात या व्यक्तीने आपल्या घरासमोर स्क्रू ड्रायव्हरचा वापर करून एका निष्पाप मांजरीला ठार मारले होते. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या व्यक्तीने हा गुन्हा केल्यावर, त्याने मृत मांजरीला काठीवर उचलून धरल्याचा फोटो व्हायरल झाला होता. दंडाधिकारी कोर्टाने याबाबत कोणत्याही साक्षीदाराकडून तपासणी केली नाही. या व्यक्तीने स्वत: ला आपल्या गुन्ह्याची कबुली देत, आपणच त्या मांजरीला ठार मारले असल्याचे सांगितले.
संजय गाडे असे या व्यक्तीचे नाव असून, तो चेंबूरच्या इंदिरा नगर येथील रहिवासी आहे. मांजरीला मारण्याचे करण देत संजयने सांगितले, मांजरीने आपल्या घरात उच्छाद मांडला होता त्यामुळे घरात प्रचंड गोंधळ उडाला होता, म्हणूनच आपण तिला मारून टाकले. या प्रकरणाबाबत न्यायालयाने त्याला जनावरांना मारणे, त्यांना त्रास त्रास देणे आणि पुरावे नष्ट करणे यासाठी दोषी ठरवले आहे. याबाबत त्याला 9.150 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. (हेही वाचा: कुत्रीच्या प्रेमप्रकरणामुळे मालकाचा संताप; शेजाऱ्या कुत्र्यासोबत अनैतिक संबंध ठेवल्यामुळे घराबाहेर हाकलले)
हा आरोपी 'शारीरिक आणि मानसिक’दृष्ट्या आजारी व्यक्ती आहे त्यामुळे तुरुंगात टाकले गेले नाही. यासाठी न्यायालयीन कायदा लागू करावा लागला. आरोपीवर आयपीसी आणि प्रिव्हेन्शन ऑफ क्रूलेटी टू अॅनिमल अॅक्ट अंतर्गत अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपाखाली त्याला जास्तीत जास्त दोन वर्ष तुरूंगवासाची शिक्षा भोगावी लागली.