Car Fire: यवताळवरून नागपूरला जाणाऱ्या कारने घेतला पेट; चार जण गंभीर जखणी (Watch Video)
car Fire News TWITTER

Car Fire: यवतमाळ जिल्ह्यात कळंबजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. नागपूर (Nagpur) वरून जात असताना, एक कारने (Car) अचानक पेट घेतला आहे. या दुर्घटनेत चार जण होरपळूल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. कारला आग लागल्याने चार जण जखमी झाले आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा- बुटीबोरी एमआयडीसीच्या टॅंकमध्ये भीषण स्फोट, सहा जण गंभीर जखमी

मिळालेल्या मााहितीनुसार, कार यवतमाळ वरून नागपूरच्या दिशेने जात होती. कारला आग लागताच घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. जखमी झालेले चार जण हे नागपूरचे रहिवासी होते. आग शार्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. नागपूर विदर्भात  तापमान वाढत असल्याचे माहिती समोर येत आहे. तेथील तापमान 39 सेल्सिअस एवढे आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून तपामान वाढत असल्याने अश्या भयंकर घटना घडत आहे.  उन्हामुळे अश्या समस्या वाढत असल्याचे समोर येत आहे. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.  कार यवतमाळवरून नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर कळंबजवळ  आली आणि अचानक पेट घेतला. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे. आगीत कारचे संपुर्ण नुकसान झाले आहे. कार जळून खाक झाली आहे.